शुक्रवार, 27 डिसेंबर 2024
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. महाराष्ट्र माझा
Written By
Last Modified: रविवार, 7 मे 2023 (11:48 IST)

Chhatrapati Sambhaji Nagar :वाढदिवसाची पार्टी जीवावर बेतली, हॉटेल चालकाने केला तरुणाचा खून, आरोपींना अटक

murder
Chhatrapati Sambhaji Nagar : छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील सिल्लोड तालुक्यात एक धक्कादायक प्रकार समोर आला आहे. वाढदिवसाची पार्टी जीवावर बेतली असून बिला वरून झालेल्या वादातून हॉटेल चालकाने कूकच्या मदतीने तरुणाचा धारधार शस्त्राने खून केला. संतोष जादूसिंग बमनावत असे या मयत तरुणाचे नाव आहे .सदर घटना 6 मे रोजी सकाळी डोंगरगाव फाट्याजवळ ही घटना घडली आहे. 
 
या प्रकरणात सिल्लोड ग्रामीण पोलिसांनी आरोपींना अटक केली आहे. अनिल जाधव आणि गजानन यादवराव दणके असे या आरोपींची नावे आहेत. 
 
शुक्रवारी 5 मे रोजी तरुणाचा वाढदिवस होता. वाढदिवस साजरा करून मित्रांसोबत हॉटेल समर येथे त्याने पार्टी केल्याची माहिती समोर आली. तिथे हॉटेल चालक आणि तरुणांमध्ये बिलावरून वाद झाले  रागाच्या भरात येऊन हॉटेलचालकाने कूकच्या मदतीने तरुणावर धारदार शस्त्राने खून केला. आरोपीने पोलिसांनी सक्ती केल्यावर गुन्ह्याची कबुली दिली आहे. 
 
संतोष बमनावत हा भवन येथील नॅशनल गेरेज वर कामाला होता तो दररोज गावातून ये जा करायचा त्याने हॉटेलवर पार्टी दिली आणि त्यात त्याचे हॉटेल चालकाशी वाद झाले आणि त्याचा हॉटेल चालकांनी खून केला. 
 




Edited by - Priya Dixit