गुरूवार, 30 नोव्हेंबर 2023
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. महाराष्ट्र माझा
Written By
Last Modified: शनिवार, 20 मे 2023 (14:06 IST)

छत्रपती संभाजीनगर: दोन वृद्धांमध्ये फ्री स्टाईल हाणामारी

छत्रपती संभाजीनगर: तरुणांमध्ये फ्री स्टाईल हाणामारी होणं सहज शक्य आहे पण दोन वृद्धांमध्ये हाणामारी होणं आश्चर्य आहे. छत्रपती संभाजी नगर येथे दोन वृद्धांमध्ये सुरुवातीस वाद झाला नंतर वादाचं स्वरूप हाणामारी पर्यंत झालं. हा सर्व प्रकार सीसीटीव्ही मध्ये कैद झाला असून ह्याचा व्हिडीओ चांगलाच व्हायरल झाला आहे. 
 
मिळालेल्या माहितीनुसार, दोन वृद्ध व्यक्ती बाईक वरून जात असताना त्यांचा एकमेकांना धक्का लागला नंतर त्यांच्यात वाद झाला नंतर या वादाचं रूपांतरण हाणामारीत झालं. या घटनेचा व्हिडीओ व्हायरल झाला आहे. 
या व्हिडीओ मध्ये दोन वृद्ध व्यक्तींची आधी बाचाबाची होते त्यात एक वृद्ध दुसऱ्याला धक्का देतो आणि हाणामारी करू लागतो. हा व्हिडीओ चांगलाच व्हायरल झाला आहे. 
 
Edited by - Priya Dixit