सोमवार, 25 नोव्हेंबर 2024
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. महाराष्ट्र माझा
Written By
Last Updated : रविवार, 2 एप्रिल 2023 (10:19 IST)

आज छत्रपती संभाजीनगरमध्ये महाविकास आघाडीची सभा

uddhav
राज्यातील सत्तांतरानंतर महाविकास आघाडीच्या तिन्ही पक्षांची पहिली एकत्रित सभा छत्रपती संभाजीनगर येथे होणार आहे. शिवसेनेसह (उद्धव ठाकरे गट) काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेस हे तिन्ही पक्ष राज्यभरात एकत्रित सभा घेणार असून त्याची सुरुवात छत्रपती संभाजीनगर शहरापासून केली जात आहे.
 
आज (2 एप्रिल) सायंकाळी 6 वाजण्याच्या सुमारास शहरातील मराठवाडा सांस्कृतिक मंडळाच्या मैदानात ही सभा पार पडणार आहे.दरम्यान या सभेच्या निमित्ताने महाविकास आघाडीकडून जोरदार तयारी करण्यात आली असून, शहरभरात होर्डिंग आणि भगवे झेंडे लावण्यात आले आहेत.
 
दुसरीकडे भारतीय जनता पक्ष आणि एकनाथ शिंदे शिवसेना यांची शहरातच सावरकर गौरव यात्रा काढण्यात येणार आहे. रामनवमीच्या पूर्वसंध्येला संभाजीनगरमध्ये हिंसेचा प्रकार घडला होता. या पार्श्वभूमीवर आजच्या शहरातील घडामोडींकडे लक्ष असणार आहे. माविआच्या रॅलीत शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे, राष्ट्रवादी काँग्रेसचे ज्येष्ठ नेते अजित पवार आणि महाराष्ट्र काँग्रेसचे अध्यक्ष नाना पटोले यांच्यासह विरोधी पक्षातील अनेक दिग्गज नेते एकत्र येणार आहेत. या माध्यमातून राज्यात निवडणुकीचे वातावरण निर्माण करण्याचा प्रयत्न युती करणार असल्याचे बोलले जात आहे.रॅलीसाठी दानवे यांनी कार्यकर्त्यांना शांततेत एकत्र येण्यास सांगितले. काही लोक जातीय सलोखा बिघडवण्याचा प्रयत्न करत असल्याचा आरोप दानवे यांनी केला. 
 
Edited By- Priya Dixit