बुधवार, 27 नोव्हेंबर 2024
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. महाराष्ट्र माझा
Written By
Last Modified: शनिवार, 1 एप्रिल 2023 (14:51 IST)

राज्यात नागरिकांना आजपासून वीज दरवाढीचा शॉक

दिवसेंदिवस महागाई वाढतच आहे. वाढत्या महागाईने सामान्य जनता त्रस्त झाली आहे. आता तयार वीजदराची भर पडली असून आजपासून महावितरण मंडळाने घरगुती वीज दरात 6 टक्क्याने वाढ केली आहे. महावितरण मंडळाकडून सामान्य नागरिकांना दिला जाणारा हा मोठा धक्का आहे. वाढीव दर आज 1 एप्रिल पासून लागू होणार असून महाराष्ट्र राज्य वितरण कंपनी लिमिटेड,अडाणी,बेस्ट आणि टाटा पावर यांनी देखील दरवाढ लागू केली आहे. महाराष्ट्र राज्य विद्युत वितरण कंपनी लिमिटेड ने घरगुती विजेच्या दरात 2023-24 वर्षांसाठी 6 टक्क्याने वाढ केली आहे. सामान्य जनतेला वाढत्या महागाईच्या फटक्यात हा अजून एक फटका मिळाला आहे. 
 
 
Edited By- Priya Dixit