सोमवार, 6 जानेवारी 2025
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. महाराष्ट्र माझा
Written By
Last Modified: शनिवार, 1 एप्रिल 2023 (13:49 IST)

काँग्रेसचे नेते माजी खासदार संदीपान थोरात यांचे निधन

पंढरपूर लोकसभा मतदारसंघातून सलग सात वेळा निवडलेले काँग्रेसचे नेते आणि माजी खासदार संदीपान थोरात यांचे वयाच्या 91 व्या वर्षी शुक्रवारी सोलापुरात निधन झाले. ते दीर्घकाळापासून आजारी होते. त्यांना अनेक दिवसांपासून हृदयविकारासह पोटाचा विकार आणि श्वसन विकाराचा त्रास होता. प्रकृतीत बिघाड झाल्यामुळे 11 मार्च पासून त्यांना सोलापुरातील एका खासगी रुग्णालयात दाखल केले असून त्यांना लाईफ सपोर्ट सिस्टीमवर ठेवण्यात आले होते. शुक्रवारी त्यांचे प्रदीर्घ आजाराने निधन झाले. ते माढा तालुक्यातील निमगाव येथे राहणारे होते. ते पेशाने वकील होते. तरुणपणातच ते काँग्रेस पक्षातून राजकारणात आले. ते सातवेळा निवडून आलेले खासदार होते. त्यांच्या पश्चात पत्नी, चार मुले , सुना, तीन मुली, जावइ आणि नातवंडे असा परिवार आहे. 
 
 
Edited By- Priya Dixit