सोमवार, 25 नोव्हेंबर 2024
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. महाराष्ट्र माझा
Written By
Last Modified: शनिवार, 1 एप्रिल 2023 (08:12 IST)

घर खरेदीदारांना दिलासा; रेडी रेकनरचे दर ‘जैसे थे’:राज्य सरकारचा निर्णय

home loan
पुणे :राज्य सरकारने रेडी रेकनरचे दर ‘जैसे थे’ ठेवण्याचा निर्णय घेतला आहे. त्यामुळे घरांच्या किंमती वाढणार नाहीत. यासंदर्भातील पत्र राज्याचे उप-सचिव सत्यनारायण बजाज यांनी मुख्य नियंत्रक महसूल प्राधिकारी तसेच नोंदणी महानिरीक्षक व मुंद्रांक नियंत्रकांना पाठवले आहे.
 
सन 2022-23 मधील रेडी रेकनरचे दर 2023-24 या आर्थिक वर्षात कायम ठेवण्यात यावे. तसेच विकासक व इतर सामान्य नागरिकांनी त्यांच्या मिळकतींच्या दरांबाबत वार्षिक बाजारमूल्य दर तक्त्यामध्ये वाढ किंवा घट करून देण्याची विनंती अर्ज नियमानुसार निर्णय घेण्यात यावेत, असा उल्लेख या पत्रामध्ये करण्यात आलेला आहे.
 
कोरोनामुळे 1 एप्रिल 2020 ऐवजी सप्टेंबर 2020 मध्ये रेडी रेकनर दरात वाढ करण्यात आली होती. त्यानंतर गेल्या वर्षी म्हणजेच सन 2021-22 या आर्थिक वर्षात रेडी रेकनरचे दर ‘जैसे थे’ ठेवण्यात आले होते. कोरोनामुळे राज्याची आर्थिक स्थिती चांगली नसल्याने गेल्या वर्षी (2022-23) राज्यात रेडी रेकनर दरात घसघशीत वाढ करत राज्य सरकारने नागरिकांना धक्का दिला होता. आगामी निवडणुका विचारात घेऊन राज्य सरकारने रेडी रेकनरच्या दरात कोणताही बदल केलेला नाही. रेडी रेकनरमध्ये कोणताही बदल न केल्यामुळे गेल्या वर्षीचेच दर आगामी वर्षभरासाठी लागू होणार आहेत.
 
Edited By- Ratnadeep Ranshoor