छत्रपती शिवाजी महाराजांची तलवार,वाघनखे महाराष्ट्रात परत येणार !
महाराष्ट्राचे आराध्य दैवत छत्रपती शिवाजी महाराजांची ब्रिटन येथे असलेली जगदंब तलवार आणि वाघनखे भारतात परत आणायच्या दृष्टीने ब्रिटिश उपउच्चायुक्त अलेन गंमेल यांनी ब्रिटिश सरकारच्या वतीने सकारात्मक प्रतिसाद दिल्यामुळे ब्रिटन कडून छत्रपती शिवाजी महाराजांची तलवार आणि वाघनखे शिवराज्याभिषेक दिनाच्या 350 व्या वर्षपूर्ती महोत्सवाच्या निमित्ताने महाराष्ट्र शासनाच्या पाण्यात देण्यात येणार आहे.
ब्रिटिश उपउच्चायुक्त अलेन गंमेल यांच्याशी झालेली चर्चा समानधनकारक झाल्याची माहिती राज्याचे सांस्कृतिक कार्यमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी दिली.
ते म्हणाले, शिवराज्याभिषेक दिनाचा 350 वर्ष पूर्तीचा सोहळा अत्यंत मोठ्या प्रमाणात साजरा करण्यात येणार असून या दिवशी महाराजांची तलवार आणि वाघनखे आणण्यासाठी ब्रिटनच्या उपआयुक्तांशी चर्चा करण्यात आली.तसेच ब्रिटन आणि भारतात सांस्कृतिक देवाण घेवाण यावर देखील चर्चा या बैठकीत करण्यात आली. या साठी महाराष्ट्रातील कलाकार ब्रिटनमध्ये सादरीकरण करतील आणि ब्रिटनचे कलाकार महाराष्टात येऊन आपली कला सादर करतील. महाराष्ट्रातून 25 विद्यार्थी ब्रिटनमध्ये अभ्यासासाठी जातील आणि तिथून देखील 25 विद्यार्थी अभ्यासासाठी येतील . वाघनखे आणि तलवार आणण्यासाठी एक बैठकब्रिटनच्या अधिकाऱ्यांशी मे च्या दुसऱ्या किंवा तिसऱ्या आठवड्यात करण्याचे योजिले आहे.
Edited By - Priya Dixit