सोमवार, 11 नोव्हेंबर 2024
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. महाराष्ट्र माझा
Written By
Last Modified: शनिवार, 24 सप्टेंबर 2022 (15:11 IST)

मुख्यमंत्री सहाय्यता निधी ऑनलाइन होणार, टोल फ्री क्रमांक, मोबाईल ॲप्लिकेशन विकसित केले जाणार

eknath shinde
राज्यातील गरजू रुग्णांना वैद्यकीय उपचारासाठी आर्थिक मदत उपलब्ध करून देणाऱ्या मुख्यमंत्री सहाय्यता निधीसाठी ऑनलाइन अर्ज पद्धती अधिक सुलभ होणार आहे. निधीच्या योजनेतील रुग्णालयांची संख्या वाढवणार आहे. तसेच टोल फ्री क्रमांक, मोबाईल ॲप्लिकेशन विकसित केले जाणार असल्याची माहिती आहे.
 
मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या निर्देशानुसार आर्थिक मदतीचे काम जास्तीत जास्त गतिमान करण्यासाठी प्रयत्न करण्यात येत आहेत. त्यानुसार याचे अॅप्लिकेशन आणि टोल फ्री क्रमांक सुरु करण्यात येणार आहे. त्यामुळे राज्यातील गरजू रुग्णांना वैद्यकीय उपचारासाठी आर्थिक मदत उपलब्ध करून देणाऱ्या मुख्यमंत्री सहाय्यता निधीसाठी तात्काळ अर्ज करणे अधिक सुलभ होईल.
 
मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या निर्देशानुसार टास्क फोर्स सदस्य डॉ. संजय ओक, पद्मश्री डॉ. तात्याराव लहाने, केईएम रुग्णालयाच्या अधिष्ठाता डॉ. संगीता रावत यांच्या मार्गदर्शनाखाली मोबाईल ॲप्लिकेशन विकसित केले जाणार आहे.
 
निधी कक्षाचे प्रमुख चिवटे यांनी बैठकीत सांगितले की, ऑनलाइन एप्लिकेशन तसेच वेबसाइटद्वारे रुग्णांचे अर्ज तत्काळ उपलब्ध होणारी यंत्रणा तयार करण्यात येत आहे. मुख्यमंत्री वैद्यकीय सहाय्यता निधीचे मोबाईल अॅप्लीकेशन तसेच मदत व मार्गदर्शनासाठी टोल फ्री नंबर लवकरच सुरु करण्यात येईल. तसेच योजनेची माहिती नागरिकांपर्यंत पोहचण्यासाठी सर्व शासकीय जिल्हा रूग्णालयांचे शल्य चिकित्सक, वैद्यकीय महाविद्यालयांचे अधिष्ठता यांनी यंत्रणा कार्यान्वित करण्याच्या सूचना दिल्या आहेत, असे त्यांनी सांगितले.
 
राज्यातील गरजू रुग्णांपर्यंत मुख्यमंत्री सहाय्यता निधी कक्ष पोहचवा, असे निर्देश मुख्यमंत्री शिंदे यांनी दिले असून त्या दृष्टीने आम्ही प्रयत्न करत असल्याचे चिवटे यांनी सांगितले. या बैठकीत खारगे यांनी कक्षाचा कामाचा आढावा घेतला आणि कामकाजाबाबत काही सूचना दिल्या.