शुक्रवार, 30 सप्टेंबर 2022
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. मुंबई
Written By
Last Modified गुरूवार, 1 सप्टेंबर 2022 (14:41 IST)

सिडकोने मेगा लॉटरी, ऑनलाईन अर्ज सुरु

मुंबईत घर घेणे आता सर्वसामांन्याच्या आवाक्या बाहेर गेले आहे. त्यामुळे  सिडकोने मेगा लॉटरी  काढणार आहे. त्यासाठीची ऑनलाईन अर्ज  करता येणार आहे. 
 
सिडकोची सदनिका तसेच व्यावसायिक गाळे, भूखंडची मेगा लॉटरी आहे. सिडकोने ऑनलाईन जाहीरात प्रसिद्ध केली आहे. तर ग्राहकांना आजपासून अर्ज करता येणार आहे. एकूण  4 हजार 158  घरांसाठी, 245 दुकाने आणि 6 व्यावसायिक भूखंडाची ही लॉटरी असणार आहे.
 
नवी मुंबईतील द्रोणागिरी, कळंबोली, तळोजा आणि खारघर नोड इथे ही घरं आहेत. परवडणाऱ्या दरात या 4 हजार 158 घरांपैकी 404 घरं ही प्रधानमंत्री आवास योजनेंतर्गत आर्थिकदृष्ट्या  दुर्बल घटकांकरिता आणि उर्वरित 3 हजार 754 घरं ही सर्वसाधारण प्रवर्गाकरिता उपलब्ध आहेत.
 
या योजनांच्या सविस्तर माहितीकरिता https://www.cidco.maharashtra.gov.in हे संकेतस्थळ उपलब्ध करुन देण्यात आले आहे. अर्ज नोंदणीपासून ते सोडतीपर्यंतच्या सर्व प्रक्रिया ऑनलाइन प्रक्रियेद्वारे पार पडणार असल्याचे सिडकोकडून सांगण्यात आले आहे.