शुक्रवार, 22 ऑगस्ट 2025
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. महाराष्ट्र माझा
Written By
Last Modified: शनिवार, 17 जुलै 2021 (22:31 IST)

मुख्यमंत्री यांचे आवाहन - कोरोना प्रतिबंधक नियमांचे पालन करूनच चित्रपट व मालिकांचे चित्रीकरण करावे

Chief Minister's Appeal
कोरोना प्रतिबंधक नियमांचे पालन करूनच चित्रपट आणि मालिकांचे चित्रीकरण करावे, असे आवाहन मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी केले आहे. चित्रपट निर्मात्यांच्या प्रोड्युसर्स गिल्ड या संस्थेच्या पदाधिकाऱ्यांशी आज मुख्यमंत्र्यांनी दूरदृश्य प्रणालीद्वारे संवाद साधला. त्यावेळी ते बोलत होते. चित्रीकरणाची वेळ आणि स्थळ याबाबत पोलिसांशी योग्य समन्वय ठेवावा, आपल्या पथकांमधल्या कलाकार आणि इतर सहकाऱ्यांची नियमित कोरोना चाचणी करावी, तसेच लवकरात लवकर प्रत्येकाचे लसीकरण करून घ्यावे असेही ते म्हणाले. कोणासाठीही आवडीने निर्बंध घातलेले नाहीत, मात्र कोरोना नियमांचे पालन करत आजवरच्या अनुभवानतून नियमांचे पालन करत काळजी घेणे गरजेचे असल्याचे त्यांनी सांगितले.