गडकिल्ल्यांच्या संवर्धनासाठी सूचना पाठवण्याचे मुख्यमंत्र्यांचे आवाहन

uddhav
Last Modified सोमवार, 14 जून 2021 (08:07 IST)
राज्यातील गड किल्ल्यांचे पावित्र्य टिकवून त्यांचे टप्प्याटप्प्याने संवर्धन करण्यासंदर्भात आता पावले टाकण्यात येत असून राज्यातील दुर्गप्रेमी, दुर्ग संवर्धक, गिर्यारोहक यांनी यासंदर्भातील आपल्या सूचना व प्रस्ताव मुख्यमंत्री सचिवालयातील संकल्प कक्षास त्वरित पाठवाव्यात असे आवाहन मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी केले. किल्ल्यांच्या संवर्धनातील अडचणी दूर करण्यासाठी पुढे यावे व कामाला सुरुवात करावी असेही त्यांनी सांगितले.
मुख्यमंत्र्यांनी राज्यातील 250 दुर्गप्रेमी आणि गिर्यारोहक यांच्याशी दूरदृश्य प्रणालीद्वारे संवाद साधला व त्यांच्या सूचना ऐकल्या. या बैठकीचे संचालन आदेश बांदेकर, मिलिंद गुणाजी यांनी केले तर अखिल महाराष्ट्र गिर्यारोहण महासंघाचे अध्यक्ष उमेश झिरपे, गिरीश टकले या प्रसिद्ध गिर्यारोहक व दुर्गप्रेमींनी आपले विचार सर्वांच्या वतीने प्रातिनिधिक स्वरूपात मांडले.

ईमेलवर सूचना पाठवा
दुर्गप्रेमींना दुर्ग संवर्धनाच्या दृष्टीने काही सूचना करावयाच्या असतील तर त्यांनी त्या [email protected] या मुख्यमंत्री सचिवालयाच्या संकल्प कक्षाला पाठविण्याचे आवाहन मुख्यमंत्र्यांनी केले. मुख्यमंत्री म्हणाले, दुर्ग संवर्धनात आपण आजपर्यंत केवळ अडीअडचणींचा पाढा वाचत होतो पण आता तसे होणार नाही. या अडचणींवर मार्ग काढून पुढे कसे जायचे ते या क्षेत्रातील तज्ज्ञ मंडळीनी एकत्र बसून ठरवावे व किल्ल्यांच्या संवर्धनाचा सर्वंकष आराखडा तयार करावा, राज्य शासन यामध्ये पूर्ण सहकार्य करेल.


यावर अधिक वाचा :

रघुराम राजन : 'केंद्र सरकार महसुलातून मिळालेला पैसा ...

रघुराम राजन : 'केंद्र सरकार महसुलातून मिळालेला पैसा राज्यांना वाटत नाही'
केंद्र सरकार महसुलाच्या माध्यमातून मिळत असलेले पैसे योग्य प्रमाणात राज्य सरकारांना वाटप ...

प्रभावशाली व्यक्तींमध्ये अनेक भारतीय

प्रभावशाली व्यक्तींमध्ये अनेक भारतीय
पीएम मोदींनी पुन्हा एकदा जगात एक जबरदस्त विजय मिळवला आहे. टाइम मासिकाने प्रसिद्ध केलेल्या ...

कोरोना लस : कोण-कोणते देश लहान मुलांचं लसीकरण करतायेत आणि ...

कोरोना लस : कोण-कोणते देश लहान मुलांचं लसीकरण करतायेत आणि का?
यूकेच्या मुख्य वैद्यकीय अधिकाऱ्यांच्या सल्ल्यानंतर, यूकेतील 12 ते 15 वर्षं वयोगटातील ...

राहुल गांधी: महात्मा गांधींप्रमाणे मोहन भागवतांचा ...

राहुल गांधी: महात्मा गांधींप्रमाणे मोहन भागवतांचा महिलांबरोबर कधी फोटो पाहिलाय?
काँग्रेसचे नेते राहुल गांधी यांनी भाजपा आणि रा. स्व. संघ हे 'महिला विरोधी' आणि 'हिंदू ...

कोकणासाठी 3 हजार 200 कोटींचा आपत्ती व्यवस्थापन कार्यक्रम

कोकणासाठी 3 हजार 200 कोटींचा आपत्ती व्यवस्थापन कार्यक्रम
कोकणामध्ये “कोकण आपत्ती व्यवस्थापन कार्यक्रम” राबविण्याचा महत्त्वपूर्ण निर्णय आज झालेल्या ...

सरकारचा निर्णय, देशांतर्गत उड्डाण 85 टक्के क्षमतेने चालवता ...

सरकारचा निर्णय, देशांतर्गत उड्डाण 85 टक्के क्षमतेने चालवता येईल
विमानाने प्रवास करणाऱ्या प्रवाशांसाठी महत्वाची बातमी. खरं तर, नागरी उड्डयन मंत्रालयाने ...

आज किंवा उद्या कधीना कधी सरकार पडेल : नारायण राणें

आज किंवा उद्या कधीना कधी सरकार पडेल : नारायण राणें
केंद्रीय मंत्री नारायण राणे यांनी पुन्हा एकदा शिवसेना खासदार संजय राऊतांसह ठाकरे सरकारवर ...

हे सर्व जण मुंगळ्यासारखे सत्तेला चिकटून बसलेले आहेत : ...

हे सर्व जण मुंगळ्यासारखे सत्तेला चिकटून बसलेले आहेत : प्रविण दरेकर
शिवसेना असो वा महाविकास आघाडी सरकारमधील राष्ट्रवादी- कॉंग्रसेचे नेते असतील, त्यांची ...

चित्रपटगृह न उघडल्याने कंगनाची महाराष्ट्र सरकारवर टीका

चित्रपटगृह न उघडल्याने कंगनाची महाराष्ट्र सरकारवर टीका
बॉलिवूड अभिनेत्री कंगना राणौतच्या प्रदर्शित झालेला सिनेमा थलाइवीसिनेमासाठी तामिळ आणि ...

राज्यप्राण्याचा दर्जा असलेल्या दुर्मीळ शेकरुची विक्रीचा ...

राज्यप्राण्याचा दर्जा असलेल्या दुर्मीळ शेकरुची विक्रीचा नाशिकमध्ये प्रयत्न
वन्यजीव संरक्षण कायद्यान्वये अनुसुची-१मध्ये समाविष्ट आणि राज्यप्राण्याचा दर्जा असलेल्या ...