बुधवार, 25 डिसेंबर 2024
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. महाराष्ट्र माझा
Written By
Last Modified: सोमवार, 14 जून 2021 (08:01 IST)

निर्बंध असतानाही लोणावळ्यात पर्यटकांची गर्दी

मागील काही दिवस सतत पावसाचा शिडकाव झाल्याने राज्यातील पर्यटन स्थळांचे सौंदर्य अधिक खुलून आले आहे. त्यातच महाराष्ट्रात कोरोना नियमांच्या धर्तीवर लागू करण्यात आलेले निर्बंध प्रशासनाने टप्प्याटप्प्याने शिथिल करण्याचा निर्णय घेतला आहे. त्यामुळे पर्यटकांची पावलं आपोआपच निसर्गरम्य ठिकाणांकडे वळू लागली आहेत. शनिवार आणि रविवारच्या सुट्टीनिमित्त नवी मुंबई आणि मुंबईकरांच्या वाटा लोणावळ्याच्या दिशेने वळल्या आहेत. त्यामुळे लोणावळ्याच्या रत्यांवर वाहतूक कोंडीही दिसत आहे.
 
धक्कादायक म्हणजे शासन नियमांनुसार पर्यटन स्थळं बंद असूनही नागरिकांनी विविध मार्ग शोधत, चक्क भिंतीवरुन उड्या मारुन या भागांत प्रवेश केला आहे. अद्यापही कोरोना गेलेला नसल्याने अशाच पद्धतीने नियमांचे उल्लंघन झाल्यास धोका अधिक वाढेल अशी भीती निर्माण झाली आहे.