शनिवार, 25 जानेवारी 2025
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. पुणे
Written By
Last Modified: बुधवार, 2 जून 2021 (12:34 IST)

पुण्यात बाजारपेठेत खरेदीसाठी गर्दी उसळली

महाराष्ट्रात 1 जून पुढील 15 दिवसांसाठी लॉकाडऊनच्या काही निमयांमध्ये बदल झालेत. त्यात पुण्यासाठी लागू केलेल्या नियमानुसार अत्यावश्यक सेवेची दुकानं रोज सकाळी 7 ते दुपारी 2 पर्यंत सुरू राहतील. अशात सुमारे दोन महिन्यांनंतर सुरू झालेल्या दुकांनावर खरेदीसाठी गर्दी उसळलेली आहे. 
 
पुण्यात महापालिकेकडून रस्त्यांची कामे सुरू आहे त्यामुळे जागोजागी ट्रॅफिक जामची स्थिती निर्माण झाली आहे. शहरात ट्रॅफिक आणि गर्दी सर्वत्र पहावयास मिळत आहे. पुणे महापालिका क्षेत्रासाठी पुढील आदेश येईपर्यंत लॉकडाऊनचे नवे नियम जाहीर करण्यात आलेत. यानुसार अत्यावश्यक सेवांची दुकाने दररोज सकाळी 7 ते दुपारी 2 पर्यंत सुरू राहतील, तर इतर दुकाने सोमवार ते शुक्रवार सकाळी 7 ते दुपारी 2 पर्यंत सुरू राहतील. दुपारी 3 नंतर संचारबंदी लागू असेल.
 
यापूर्वी कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी शहरात महापालिकेकडून निर्बंध असल्यामुळे केवळ सकाळी सात ते अकरा या वेळेत ठरावीक दुकानांना परवानगी देण्यात आली होती. मात्र आता मंगळवारपासून शहरातील सर्वच दुकाने उघडण्यास परवानगी मिळाल्यावर शहरात गर्दी उसळून आली आहे. दोन महिन्यांपासून घरात कोंडलेले लोकं अडकलेली काम आटोपण्यासाठी रस्त्यावर उतरली. 
 
शहरात सकाळापासून रस्त्यांवर वाहनांची गर्दी होऊ लागली. सकाळी सात वाजेपासूनच दुकानं खुली झाली आहेत. दुपारी 2पर्यंतच दुकानं सुरु राहतील अशात सकाळपासून अनेक रस्त्यांवर वाहतुकीची कोंडी झाली होती. शहरातील सर्व प्रमुख बाजारात खरेदीसाठी गर्दी उसळली. भवानी पेठ, रविवार पेठ, तुळशीबाग, मंडईसह, बाजीराव रस्ता, शिवाजी रस्ता, टिळक रस्ता, फर्ग्युसन रस्ता, जंगली महाराज रस्ता, गणेशखिंड, सिंहगड रस्ता, वारजे-कर्वेनगर, हडपसर अशा सर्वच भागात खरेदीसाठी नागरिक बाहेर पडले. 
 
दरम्यान महापालिकेकडून शहराच्या अनेक भागात रस्त्यांची कामे सुरु आहेत. याचा फटका देखील वाहतुकीला बसला. दोन नंतर दुकानं बंद झाल्यावर वर्दळ कमी होण्याचं चित्र दिसतं. तोपर्यंत येथे कोरोना आजार शहरात नाहीचं असं चित्र दिसून येत आहे. शहराबरोबरच उपनगरातही हेच चित्र पाहायला मिळत आहे. 
 
पुण्यासाठी परवानगी
पुणे महापालिका क्षेत्रासाठी 1 जून पासून पुढील आदेश येईपर्यंत लॉकडाऊनचे नवे नियम जाहीर करण्यात आलेत. यानुसार अत्यावश्यक सेवांची दुकाने दररोज सकाळी 7 ते दुपारी 2 पर्यंत सुरू राहतील, तर इतर दुकाने सोमवार ते शुक्रवार सकाळी 7 ते दुपारी 2 पर्यंत सुरू राहतील. दुपारी 3 नंतर संचारबंदी लागू असेल.
 
सर्व प्रकारच्या ई-कॉमर्स सेवा सुरू राहतील. मद्याची दुकाने सर्व दिवस सकाळी 7 ते दुपारी 2 पर्यंत सुरू राहतील. हॉटेल फक्त पार्सल सेवेसाठी सुरू राहतील.
शासकीय कार्यालये 25 टक्के उपस्थितीत सुरू राहतील, खासगी कार्यालये मात्र बंद राहतील.
पिंपरी चिंचवड महापालिकेचे आदेशही पुणे महापालिकेच्या निमयांप्रमाणे सारखेच आहेत. पुणे ग्रामीण भागात मात्र जुनेच नियम असतील. ग्रामीण भागात सूट देण्यात आलेली नाही.