मंगळवार, 24 डिसेंबर 2024
  1. मनोरंजन
  2. बॉलीवूड
  3. सिनेगप्पा
Written By
Last Modified: मुंबई , सोमवार, 2 नोव्हेंबर 2020 (10:41 IST)

HBD Shah Rukh Khan: शाहरुखचे चित्रपट आपल्या रोमँटिक स्टाइलसाठी ओळखली जात असली तरी खलनायक म्हणूनही त्याने प्रेक्षकांची मने जिंकली आहेत

बॉलीवूडचा किंग शाहरुख खान आज आपला 55 वा वाढदिवस साजरा करीत आहे. शाहरुख खान 28 वर्षांहून अधिक काळ (Shah Rukh Khan Birthday) इंडस्ट्रीमध्ये आहे आणि आज तो इंडस्ट्रीमधील सर्वात यशस्वी अभिनेत्यांपैकी एक आहे. त्याने आपल्या करिअरची सुरुवात दीवाना या चित्रपटापासून केली. शाहरुख खानचे चित्रपट आपल्या रोमँटिक स्टाइलसाठी ओळखली जात असली तरी खलनायक म्हणूनही त्याने प्रेक्षकांची मने जिंकली आहेत. इंडस्ट्रीला रोमान्स शिकवणारा शाहरुख खानही बर्‍याच चित्रपटांमध्ये व्हिलनच्या भूमिकेत दिसला आहे. आज, शाहरुख खान आपला वाढदिवस साजरा करीत असताना, त्याच्या लोकप्रिय नकारात्मक भूमिकांविषयी आपण सांगू-
 
बाजीगर
1993 च्या बाजीगर सिनेमात शाहरुख खान नकारात्मक भूमिकेत दिसला होता. या चित्रपटात शाहरुखबरोबर काजोल आणि शिल्पा शेट्टी देखील दिसले.
 
डर
1993 च्या डरमध्ये पुन्हा तो नकारात्मक भूमिकेतही दिसला आणि प्रेक्षकांना हा चित्रपट इतका आवडला की प्रत्येकजण त्याच्यासाठी वेडा झाला होता.
 
अंजाम
1994 मध्ये माधुरी दीक्षित सोबत शाहरुख खान नकारात्मक भूमिकेत दिसला होता आणि सर्वांच्या अंगावर काटे आले होते.
 
जोश
शाहरुख खान 2000 च्या जोशमध्येही खलनायकाच्या भूमिकेत दिसला होता. ऐश्वर्या राय त्याची बहीण आणि चंद्रचूर सिंहही या चित्रपटात दिसले.
 
डॉन
2006 च्या डॉन फ्रेंचायझी चित्रपटामध्ये शाहरुखची खलनायक शैली लोकांना घाबरवण्यासाठी पुरेशी होती.