सोमवार, 23 डिसेंबर 2024
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. महाराष्ट्र माझा
Written By
Last Updated : शुक्रवार, 7 ऑक्टोबर 2022 (20:57 IST)

एसटी कर्मचाऱ्यांसाठी मुख्यमंत्र्यांची मोठी घोषणा, संप काळात बडतर्फ केलेल्या कर्मचाऱ्यांना पुन्हा सेवेत घेण्याचे आदेश

eknath shinde
एसटी कर्मचाऱ्यांसाठी दिलासादायक बातमी आहे. एसटी संप काळात बडतर्फ केलेल्या कर्मचाऱ्यांना पुन्हा सेवेत घेण्याचे आदेश मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दिले आहे. एसटी महामंडळाची बैठक मुख्यमंत्रीसह पार पडली.या बैठकीत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी बडतर्फ केलेल्या एसटी कर्मचाऱ्यांना पुन्हा कामावर घेण्याचे आदेश दिले.अशी माहिती सूत्रांकडून मिळाली आहे.  

एसटी महामंडळाचे राज्य सरकारमध्ये विलीनीकरण करण्याची मागणी घेत एसटी कर्मचाऱ्यांनी संप केला होता. ठाकरे सरकार ने अल्टिमेटम दिल्यावर देखील एसटी चे कर्मचारी कामावर रुजू झाले नसल्यामुळे त्यांना बडतर्फ करण्यात आलं. तब्बल 118 कर्मचाऱ्यांना बडतर्फ करण्यात आलं होते. त्या सर्व 118 एसटी कर्मचाऱ्यांना पुन्हा सेवेत घेण्याचे आदेश मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दिले आहेत. राज्य सरकारी कर्मचाऱ्यांप्रमाणे सोयी मिळण्याची मागणी करत अनेक महिने संप केला. या संपामध्ये अनेक एसटी कर्मचाऱ्यांनी आत्महत्या देखील केली. तर तब्बल 118 कर्मचाऱ्यांना बडतर्फ करण्यात आलं .
Edited By - Priya Dixit