सोमवार, 23 डिसेंबर 2024
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. महाराष्ट्र माझा
Written By
Last Modified: शुक्रवार, 7 ऑक्टोबर 2022 (14:31 IST)

शिवसेनेकडून पुरावे सादर करण्यात आल्यानंतर धनुष्यबाणाबाबत निर्णय

shiv sena
निवडणूक चिन्ह असलेल्या धनुष्यबाणावर हक्क सांगितला आहे. दरम्यान, सर्वोच्च न्यायालयात सुनावणी सुरू असताना धनुष्यबाणाचा वाद निवडणूक आयोगासमोर आला आहे. त्यातच मुंबईतील अंधेरी पूर्व मतदारसंघात होत असलेल्या पोटनिवडणुकीच्या पार्श्वभूमीवर निवडणूक आयोग धनुष्यबाणावर आजच निर्णय घेणार असल्याचे सांगण्यात येत होते. मात्र निवडणूक आयोगासमोरील धनुष्यबाण चिन्हाबाबतचा निर्णय हा लांबणीवर पडला आहे. निवडणूक आयोगात धनुष्यबाणावर आज निर्णय होणार नसल्याचे स्पष्ट झाले आहे.
 
अंधेरी पूर्व पोटनिवडणुकीपूर्वी धनुष्यबाण चिन्हावर निर्णय होईल. हे चिन्ह दोन पैकी एका गटाला मिळेल किंवा ते गोठवले जाईल, असा अंदाज वर्तवला जात होता. मात्र याबाबतचा निर्णय निवडणूक आयोगाने लांबणीवर टाकला आहे. निवडणूक चिन्हाबाबत पुरावे सादर करण्यासाठी शिवसेनेला देण्यात आलेली मुदत आज संपत आहे. त्यामुळे शिवसेनेचे ठाकरे गटाचे शिष्टमंडळ हे आज निवडणूक आयोगाला भेटून पुरावे सादर करण्याची शक्यता आहे. शिवसेनेकडून पुरावे सादर करण्यात आल्यानंतर धनुष्यबाणाबाबत निर्णय देण्याची तारीख निश्चित होणार आहे.
Edited by : Ratnadeep Ranshoor