गुरूवार, 9 जानेवारी 2025
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. महाराष्ट्र माझा
Written By
Last Modified: शुक्रवार, 7 ऑक्टोबर 2022 (19:39 IST)

उद्धव ठाकरेंनी मला संपविण्याचा प्रयत्न केला! नारायण राणेंचा पत्रकार परिषदेत गौप्य स्फोट

uddhav naraya rane
दसऱ्या निमित्त उद्धव ठाकरे यांचा शिवतीर्थावर झालेल्या दसऱ्याच्या मेळाव्यात भाजप आणि पंत प्रधान मोदी आणि अमित शहा यांचावर जोरदार टीका केली.  त्याला प्रत्युत्तर म्हणून नारायण राणे यांनी पत्रकार परिषद घेतली आणि त्यात गौप्य स्फोट करून म्हणाले की, उद्धव ठाकरे यांनी मला मारण्यासाठी छोटा राजन आणि छोटा शकील याला सुपारी दिली होती. तसेच मनोहर जोशी यांच्या घरावर हल्ला करण्यासाठी सदा सरवणकर यांना सांगितले होते. 
मला मारण्याचा प्रयत्न करण्याऱ्यांवर मी पुरून उरलो. मला कोणीही मारू शकल नसून मी जिवंत आहे. उद्धव ठाकरे यांनी मोदींचे फोटो लावून 2019 मध्ये निवडणूक लढली आणि आता त्यांच्यावर टीका करत आहे. असे गौप्य स्फोट त्यांनी आज घेतलेल्या पत्रकार परिषदेत केले.  
Edited By- Priya Dixit