गुरूवार, 23 जानेवारी 2025
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. महाराष्ट्र माझा
Written By
Last Modified: शुक्रवार, 7 एप्रिल 2023 (21:00 IST)

मुख्यमंत्र्यांच्या अयोध्यावारीची धुरा नाशिकच्या पदाधिकाऱ्यांवर

eknath shinde
नाशिक : मुख्यमंत्री एकनाथ शिंदे येत्या रविवारी अयोध्येच्या दौऱ्यावर जात आहेत. या अयोध्यावारीची धुरा नाशिकच्या पदाधिकाऱ्यांवर सोपविण्यात आली आहे. मुख्यमंत्री शिंदे यांच्या या दौऱ्याच्या पूर्वतयारीसाठी यापूर्वी उद्धव ठाकरे आणि आदित्य ठाकरेंच्या अयोध्या दौऱ्याचे यशस्वी नियोजन करणारे आणि आता शिंदे गटा असणारे संपर्कनेते भाऊसाहेब चौधरी, सचिव नरेश म्हस्के यांच्यासह जिल्हाप्रमुख अजय बोरस्ते यांचे पथक अयोध्येत दाखल झाले आहे. यासोबतच या दौऱ्यासाठी नाशिकमधून तीन हजार कार्यकर्तेही रेल्वेने रवाना झाले आहेत.
 
दरम्यान नाशिकहून शिवसैनिक विशेष रेल्वेने दुपारी चार वाजता अयोध्येला रवाना झाले आहेत. 18 बोगीतून 1200 शिवसैनिक अयोध्येत दाखल होणार आहेत. या दौऱ्यासाठी खास टीशर्ट बनविण्यात आले आहे. रेल्वे बोगीवर लावण्यासाठी स्टिकर्स तयार करण्यात आले आहेत. तालुका आणि विधानसभा मतदारसंघ निहाय कार्यकर्त्यांसाठी बोगी आरक्षित करण्यात आली आहे.  या गाडीतून नाशिकमधून तीन हजार कार्यकर्ते  महाआरतीमध्ये सहभागी होणार  आहेत. 
 
Edited By- Ratnadeep Ranshoor