बुधवार, 8 जानेवारी 2025
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. महाराष्ट्र माझा
Written By
Last Modified: बुधवार, 22 डिसेंबर 2021 (09:43 IST)

पतंग पकडण्याच्या नादात चिमुकल्याने गमावला जीव

नाशिकच्या सिन्नर येथे हृदयद्रावक घटना घडली आहे. पतंग पकडण्याच्या नादात एक 7 वर्षाचा चिमुकला धावत सुटला आणि तोल जाऊन विहिरीत पडला. विहिरीत पडून या मुलाचा दुर्देवी अंत झाला. ही धक्कादायक घटना सिन्नर येथे घडली आहे. प्रज्वल पांडुरंग आव्हाड असे या मयत मुलाचे नाव आहे. मृत प्रज्वल आपल्या मित्रांसह पतंग उडवीत होता. पतंगाची दोर तुटल्याने हे मुलं पतंग पकडण्यासाठी धावत सुटले आणि प्रज्वल जवळच असलेल्या विहिरीत जाऊन पडला आणि त्याचा बुडून दुर्देवी अंत झाला. त्याच्या मित्रांनी त्याला हाक दिली पण विहिरीतून त्यांना कोणताही प्रतिसाद मिळाला नाही .घाबरून त्याचे मित्र रडू लागले. रडत रडत घरी येऊन त्यांनी आपल्या कुटुंबियांना  ही माहिती दिली. लोकांनी विहिरीकडे धाव घेऊन विहिरीत उडी मारून प्रज्वलचा शोध घेतला. त्यांना अपयश हाती आले. नंतर अग्निशमन दलाच्या जवानांना बोलावले. त्यांनी अथक प्रयत्नांनंतर मृत प्रज्वलचा मृतदेह पाण्यातून बाहेर काढल्यावर परिसरात शोकाकुल वातावरण पसरले .पोलिसांनी अपघाती मृत्यूची नोंद करून पुढील तपास करत आहे.