शुक्रवार, 8 नोव्हेंबर 2024
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. महाराष्ट्र माझा
Written By
Last Modified: सोमवार, 14 ऑगस्ट 2017 (17:35 IST)

चितळे मिठाई : कर्मचारी पगार वाढीसाठी संपावर

पुण्यातील  चितळे मिठाईच्या दुकानातल्या कर्मचाऱ्यांनी वाढीव पगाराची मागणी करत संप पुकारला आहे. या संपामुळे ऐन सणासुदीच्या काळात पुणेकरांना अनेक मिठाईचे पदार्थ मिळणार नाहीत. शहरातल्या काही दुकानांच्या बाहेर तर कर्मचाऱ्यांच्या संपामुळे पुढील काही दिवस पदार्थ उपलब्ध नसणाऱ्या पदार्थांची यादीही लावण्यात आली आहे. कोकोनट बर्फीसह डिंक लाडू, रवा लाडू, मोतीचूर लाडू, आंबा बर्फी, चिवडा असे अनेक पदार्थ सणासुदीच्या काळात चितळेंच्या दुकानातून गायब झाले आहेत. 

चितळे बंधूमध्ये बऱ्याच वर्षापासून अनेक कामगार काम करत आहेत. मात्र, पगारात म्हणावी तशी वाढ होत नसल्याचं येथील काही कामगारांचं म्हणणं आहे. त्यामुळे त्यांनी हा संप पुकारला आहे. सध्या पुण्यात चितळेंची एकूण 20 दुकानं असून 1000 पेक्षा अधिक कामगार इथं आहेत. त्यापैकी 120 कर्मचाऱ्यांनी संप पुकारला आहे.