रविवार, 26 जानेवारी 2025
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. महाराष्ट्र माझा
Written By
Last Modified: रविवार, 30 मे 2021 (12:16 IST)

आधी मराठा,आता OBC समाजाची माती केली, चित्रा वाघ यांची राज्य सरकारवर टीका

सर्वोच्च न्यायालयाने स्थानिक स्वराज्य संस्थेतील अतिरिक्त ओबीसी आरक्षण रद्द ठरवलं आहे. यावरून विविध पक्षांकडून तीव्र प्रतिक्रिया उमटताना दिसत आहेत.
 
या प्रकरणावरून भाजप नेत्या चित्रा वाघ यांनी राज्य सरकारवर जोरदार निशाणा साधला आहे.
 
राज्य सरकारने आधी मराठा, तर आता OBC समाजाची माती केली, अशी टीका चित्रा वाघ यांनी केली.
 
यासंदर्भात, उद्धव ठाकरे सरकारची पुनर्विचार याचिका सर्वोच्च न्यायालयाने फेटाळून लावली आहे. राज्य सरकारच्या नाकर्तेपणामुळे स्थानिक स्वराज्य संस्थेतील अतिरिक्त ओबीसी आरक्षण रद्द झालं, अशी भूमिका वाघ यांनी घेतली आहे.