शुक्रवार, 5 डिसेंबर 2025
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. महाराष्ट्र माझा
Written By
Last Modified: सोमवार, 27 सप्टेंबर 2021 (08:07 IST)

चक्क पेट्रोल पंपावर उभ्या असलेल्या ट्रकमधून करत होते डिझेलची चोरी..

Chucky was stealing diesel from a truck parked at a petrol pump. Maharashtra News Regional Marathi News Webdunia Marathi
नाशिक पेट्रोल पंपावरील ट्रकमधून डिझेल चोरी करणाऱ्या दोन सराईतांना आडगाव पोलिस ठाण्याच्या गुन्हे शोध पथकाने हिरावाडीत अटक केली. चंद्रबहादूर भीमबहादूर सोनार (रा. श्रीरामपूर) व सागर दत्तात्र्येय गरड (रा. जोशीवाडा, हिरावाडी) अशी संशयितांची नावे आहेत.
 
पोलिसांनी दिलेली माहिती व विश्वास जाधव (रा. नांदुरनाका) यांच्या तक्रारीनुसार महामार्गावरील ट्रक टर्मिनल्स येथील शहीद पेट्रोल पंपावर १९ रोजी रात्री उभ्या केलेल्या ट्रकच्या डिझेल टाकीतून २३० लिटर डिझेलची चोरी झाली.याबाबत तपासात पथकाचे विजयकुमार सूर्यवंशी यांना संशयित मेडिकल कॉलेज चौफुली येथे येणार असल्याची माहिती मिळाली.
 
त्यानुसार सापळा रचत कारचा (एमएच ०६ एझेड २३०१) चालक चंद्रबहादूर सोनार याच्या चौकशीत हिरावाडीतील सागर गरडच्या मदतीने डिझेल चोरी केल्याची कबुली दिली. पथकाने दोघांना अटक केली.