रविवार, 5 जानेवारी 2025
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. महाराष्ट्र माझा
Written By
Last Modified: रविवार, 26 सप्टेंबर 2021 (13:36 IST)

कन्हैया कुमार काँग्रेसमध्ये प्रवेश करणार?

जेएनयू विद्यापीठाचा माजी विद्यार्थी आणि भारतीय कम्युनिस्ट पार्टीचा नेता कन्हैया कुमार 28 सप्टेंबर रोजी काँग्रेसमध्ये प्रवेश करणार आहे. 
 
काही दिवसांपूर्वीच कन्हैया कुमार यांनी काँग्रेस नेते राहुल गांधी यांची भेट घेतली होती. यानंतर त्यांच्या काँग्रेस प्रवेशाच्या चर्चा सुरू झाल्या.परंतु आता कन्हैया कुमार 28 सप्टेंबरला प्रवेश करणारअसल्याचं वृत्त आहे.
 
कन्हैया कुमार हा त्याच्या भाषणांसाठी ओळखला जातो. शिवाय, 2019 मध्ये बेगूसराय लोकसभा मतदारसंघातून त्यांनी निवडणूक लढवली होती. भाजपचे नेते गिरीराज सिंह यांच्याकडून त्यांचा पराभव झाला.