रविवार, 5 जानेवारी 2025
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. महाराष्ट्र माझा
Written By
Last Modified: गुरूवार, 30 जून 2022 (10:57 IST)

उद्धव ठाकरेंविरोधात बंडखोरी करणाऱ्या बच्चू कडूंना क्लीन चिट

bachhu kadu
राज्यमंत्री तथा अकोला जिल्ह्याचे पालकमंत्री बच्चू कडू यांना एका गैरव्यवहार प्रकरणी अकोल्यात क्लीन चिट देण्यात आली आहे.
 
बच्चू कडू यांना तीन रस्त्यांच्या कामात गैरव्यवहार केल्याच्या प्रकरणातून क्लीन चिट मिळाली आहे. अस्तित्वात नसलेल्या तीन रस्त्यांच्या कामात तब्बल एक कोटी 95 लाखांच्या गैरव्यवहाराचा आरोप त्यांच्यावर करण्यात आला होता. वंचित बहुजन आघाडीच्या तक्रारीनंतर हे आरोप झाले होते. 
 
उद्धव ठाकरे यांनी मुख्यमंत्रीपदाचा राजीनामा दिला आहे. एकनाथ शिंदेंसह शिवसेनेच्या अनेक आमदारांनी केलेल्या बंडखोरीमुळे सरकार अल्पमतात आलं असून यात बच्चू कडू यांचाही सहभाग आहे.