मंगळवार, 24 डिसेंबर 2024
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. महाराष्ट्र माझा
Written By
Last Modified: नागपूर , मंगळवार, 12 डिसेंबर 2017 (09:24 IST)

नागपूर : दंगल नियंत्रण पथकाची मुख्यमंत्र्यांनी केली पाहणी

विधानभवन येथे आगमन झाल्यानंतर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी गेटवर तैनात असलेल्या दंगल नियंत्रण पथकाची पाहणी केली. यावेळी राज्याचे पोलीस महासंचालक सतीश माथूर यांनी पथकाची व त्यांना देण्यात आलेल्या साधनांची माहिती दिली.
 
पोलीस आधुनिकीकरणांतर्गत दंगल नियंत्रण पथकांना बॉडी प्रोटेक्टर साधने दिली आहेत. या साधनामुळे कुठल्याही दंगल अथवा इतर परिस्थितीत पोलिसांना दगड, काठी, बाटल्या यापासून संरक्षण मिळणार आहे.