बुधवार, 25 डिसेंबर 2024
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. महाराष्ट्र माझा
Written By

आघाडी सरकारच्या काळात दिल्या जमिनी - मुख्यमंत्री

आज दुस-या दिवशी विरोधकांनी  पावसाळी अधिवेशनाच्या  मुख्यमंत्र्यांवर जोरदार हल्लाबोल केला आहे. मात्र मुख्यमंत्र्यांनी त्यास जश्यास तसे अगदी  चोख उत्तर दिले आहे. विरोधकांनी मुख्यमंत्र्यांवर    सिडको जमीन घोटाळ्यावरून गंभीर आरोप केले आहेत. मुख्यमंत्र्यांनी त्या आरोपांचं  खंडन केलं. अर्धी वस्तुस्थिती  विरोधी पक्षांनी मांडली आहे. आघाडी सरकारच्या काळात प्रकल्पग्रस्तांना पृथ्वीराज चव्हाण मुख्यमंत्री असताना  जमिनी दिल्या गेल्या आहेत.
 
जमिनीचं वाटप  आघाडी सरकारच्या काळात 660 हेक्टर झालं होतं. जिल्हाधिका-यांच्या  या जमिनी  अखत्यारितील आहेत. जिल्ह्याधिका-यांचे अधिकार  आघाडी सरकारच्या काळात वाढवण्यात आले. पृथ्वीराज चव्हाणांच्या काळात जमीन व्यवहाराचे अधिकार  अतिरिक्त जिल्हाधिकाऱ्यांना दिलेत, त्यामुळे त्याचा मंत्र्यांशी किंवा मंत्रालयाशी संबंध नाही. कुणाच्या तरी सांगण्यावरून आरोप करू नका, असा सल्लाही मुख्यमंत्र्यांनी पृथ्वीराज चव्हाणांना दिला आहे. त्यामुळे हे अधिवेशन सुद्धा आरोपात होते की काही कामकाज होणार    आहे, असा प्रश्न निर्माण होतो आहे.