बुधवार, 25 डिसेंबर 2024
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. लोकप्रिय
Written By

मध्य आणि हार्बर रेल्वेवर परिणाम वाहतूक 15 ते 20 मिनिट उशीरानं

कोसळणारया पावसामुळे मध्य आणि हार्बर रेल्वेवर परिणाम झाला आहे. दोन्ही ठिकाणची वाहतूक 15 ते 20 मिनिट उशीरानं  सुरु आहे. त्यामुळे प्रवास करत असलेल्या  नागरिकांचे मोठे हाल होत आहेत.

आज पावसाचा जोर कायम असल्यामुळे मध्य आणि हार्बर रेल्वेची वाहतूक उशिराने सुरु आहे. पश्चिम रेल्वे मात्र तुलनेने सुरळीत आहे.  मुंबई-गोवा महामार्गावर दरड कोसळल्याची घटना घडली आहे. महाडनजीक केंबुर्लीजवळ ही दरड कोसळलीअसून, यामुळे मुंबई गोवा मार्गावरील दोन्ही बाजूची वाहतूक ठप्प आहे.

मागील  दोन दिवसांपासून  मुसळधार पाऊस पडत आहे. त्यामुळेच ही दरड कोसळल्याचं सांगितलं जात आहे. पण सुदैवाने दरड कोणत्याही वाहनावर न कोसळल्यामुळे कोणतीही जीवितहानी झाली नाही. मात्र अथक प्रयत्न करत ही दरड दूर केली   असून वाहतूक फारच धीम्या   गतीने सुरु आहे.