मंगळवार, 24 डिसेंबर 2024
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. महाराष्ट्र माझा
Written By
Last Modified: शनिवार, 21 मे 2022 (21:17 IST)

मुख्यमंत्र्यांनी माझे कुटुंब माझी जबाबदारी पार पाडावी : नवनीत राणा

navneet rana
मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी पेट्रोल डिझेलचे दर कमी करून जनतेला दिलासा द्यावा अशी मागणी खासदार नवनीत राणा यांनी केली आहे. मुख्यमंत्र्यांनी माझे कुटुंब माझी जबाबदारी पार पाडावी. केंद्र सरकारने पेट्रोल डिझेलवरील टॅक्स कमी करण्याच्या निर्णयाचं स्वागत करत खासदार नवनीत राणा यांनी ही मागणी केली आहे.
 
'केंद्र सरकार मागील सात महिन्यात पेट्रोल डिझेल मध्ये कपात केली आहे आणि उज्ज्वला गॅस मध्ये कपात करून देशातील जनतेला दिलासा दिला आहे. आता महाराष्ट्र सरकारची बारी आहे. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना माझे कुटूंब माझी जबाबदारी चांगली समजते. माझा महाराष्ट्र माझी जबाबदारी हे केव्हा कळेल. हा प्रश्न सर्व महाराष्ट्र पाहत आहे.'
 
'महाराष्ट्र सरकार आता पेट्रोल डिझेलच्या किमंती कमी करून दिलासा देणार आहे का? केंद्राकडे बोट दाखवता तर मग केंद्रा सारखे कामे करा.' असं देखील खासदार नवनीत राणा यांनी म्हटलं आहे.