बुधवार, 8 जानेवारी 2025
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. महाराष्ट्र माझा
Written By
Last Modified: मंगळवार, 19 जुलै 2022 (08:48 IST)

कॉ. माधवराव गायकवाड जीवनगौरव पुरस्कार सुकुमार दामले यांना जाहीर

Facebook स्वातंत्र्यसैनिक कॉम्रेड माधवराव गायकवाड बहुउद्देशिय संस्थेतर्फे कॉम्रेड माधवराव गायकवाड जीवनगौरव पुरस्कार कॉम्रेड सुकुमार दामले (दिल्ली) यांना आज कॅा. गायकवाड यांच्या चौथ्या जयंती दिनी जाहीर करण्यात आला. रोख रक्कम ३१ हजार रुपये स्मृती चिन्ह, गौरवपत्र ,शाल देऊन मान्यवरांच्या हस्ते सन्मानित करण्यात येणार असल्याची माहिती संस्थेच्या अध्यक्ष अॅड. साधना गायकवाड, सचिव राजू देसले यांनी दिली.
 
भारतीय कम्युनिस्ट पक्षाचे जेष्ठ नेते, स्वातंत्र्य सेनानी, संयुक्त महाराष्ट्र आंदोलनाचे नेते, खंडकरी शेतकऱ्यांना न्याय मिळवून देणारे माजी आमदार कॉम्रेड माधवराव गायकवाड यांचे १२ नोव्हेंबर २०१८ रोजी वयाच्या ९३ व्या निधन झाले. कॉम्रेड माधवराव गायकवाड यांचे कार्य शेतकरी, स्वातंत्र्य चळवळीत, खंडकरी शेतकरी प्रदिर्घ लढ्यातून जमीन मिळवून दिली आहे. सहकार क्षेत्रात हि छत्रपती नाशिक जिल्ह्या नागरी सहकारी पतसंस्थाचे संस्थापक अध्यक्ष होते २५ वर्ष पूर्वी स्थापन केलेल्या पथसंस्थेचे आठ शाखा कार्यरत आहेत. हौसिग सोसाईटी उभ्या केल्या आहेत. त्यातून अनेकांना घरे मिळालेत आहेत, नांदगाव विधानसभेचे आमदार, सहा वर्ष विधांपरिषदेचे विरोधी पक्षनेते, भाकपचे १२ वर्ष राज्य सरचिटणीस, किसान सभेचे १५ वर्ष अध्यक्षपद भूषविले. आयटक संलग्न नगरपालिका कर्मचारी संघटना, रेल्वे युनियन, आदी चळवळीत ७५ वर्ष योगदान दिले आहे. कॉम्रेड माधवराव गायकवाड(बाबूजी) यांचा विचाराचा वारसा व कार्य नेण्यासाठी स्वातंत्र्य सैनिक कॉम्रेड माधवराव गायकवाड बहुउद्देशीय संस्था स्थापन करण्यात आली आहे. संस्थेच्या वतीने हा पुरस्कार दरवर्षी दिला जात आहेत.
 
जन्म २ नोव्हेंबर १९४८, हैदराबादला आजोळी झाला.शिक्षण : प्राथमिक शिक्षण जळगाव जिल्ह्यातील अमळनेरला म्युनिसिपल शाळेत, त्यानंतर प्रताप हायस्कूल पाचवीपर्यंत, बुलढाण्याला एडेड हायस्कूल सहावी, सातवी परत प्रताप हायस्कूल, अमळनेर. त्यानंतर आठवी, नववी, दहावी सांगली टेक्निकल स्कूल, त्यानंतर मॅट्रिक मॉडर्न हायस्कूल,पुणे, पुढे प्री-युनिव्हर्सिटी, जानकीदेवी बजाज कॉलेज, वर्धा. त्यानंतर आय.आय.टी., कानपूर १९६५ ते १९७० बॅचलर ऑफ टेक्नॉलॉजी.नोकरी :भाभा ऑटोमिक रिसर्च सेंटर, मुंबई त्यानंतर ही नोकरी सोडली आणि मर्चंट नेव्ही मध्ये माझगाव डॉक मुंबईमध्ये एक वर्ष ट्रेनिंग त्यानंतर मरीन इंजिनिअर म्हणून जून ७५ ते फेब्रुवारी ७७ पर्यंत काम केलं.