Petrol Diesel Prices : तेल कंपन्यांनी जाहीर केले नवीन दर, आजचे दर तपासा
सरकारी तेल कंपन्यांनी शनिवार, 16 जुलैसाठी पेट्रोल आणि डिझेलचे नवीन दर जाहीर केले आहेत.पेट्रोल आणि डिझेलच्या दरात आज सलग 56 व्या दिवशी कोणताही बदल झालेला नाही, किमती कायम आहेत. दिल्लीमध्ये पेट्रोलची किंमत 96.72 रुपये आणि डिझेल डिझेलची किंमत 89.62 रुपये प्रति लिटर मिळत आहे.
महाराष्ट्र सरकारने पेट्रोल आणि डिझेलच्या दरात कपात करण्याचा निर्णय घेतला आहे. पेट्रोलचा दर 5 रुपयांनी तर डिझेलचा दर 3 रुपयांपर्यंत कमी करण्याची घोषणा मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी केली आहे. त्यामुळे महाराष्ट्रात पेट्रोल 5 तर डिझेल 3 रुपयांनी स्वस्त झालं आहे.
4 प्रमुख महानगरांमधील पेट्रोल-डिझेलचे दर
मुंबई - पेट्रोल 106.35 रुपये प्रति लीटर आणि डिझेल 94.28 रुपये प्रति लीटर.
दिल्ली - दिल्लीत पेट्रोलचा दर प्रतिलिटर 96.72 आणि डिझेलचा दर 89.62 इतका आहे.
चेन्नई - चेन्नईत पेट्रोल 102.63 रुपये प्रतिलिटर आणि डिझेल 94.24 रुपये प्रतिलिटर इतक्या दराने विकलं जातंय.
कोलकाता - कोलकत्यामध्ये पेट्रोलचा दर प्रतिलिटर 106.03 रुपये आणि डिझेल दर प्रतिलिटर 92.76 रुपये इतका आहे.