शनिवार, 4 जानेवारी 2025
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. महाराष्ट्र माझा
Written By

मुंबईसह राज्यात सर्वच जिल्ह्याचा पारा खालावला

मुंबईसह राज्यात सर्वच जिल्ह्याचा पारा खालावला आहे. राज्यातील सर्वात कमी तापमानाची नोंद नाशिक जिल्ह्यातील निफाडमध्ये झाली आहे. निफाड तालुक्यातील कसबे सुकेना इथं 2 अंश सेल्सिअस किमान तापमानाची नोंद झाली आहे. दरम्यान मुंबईकरांची आजची सकाळ कुडकुडत उजाडली. 
 
मिनी काश्मीर म्हणून ओळखल्या जाणारया महाबळेश्वर इथे सलग दुसऱ्या दिवशी कडाक्याची थंडी पडल्याने, लिंगमळा आणि वेण्णा लेक परिसरात दवबिंदू गोठले आहेत. वेण्णालेक,लिंगमळा परिसरात पारा 3 अंशावर आला आहे. गेल्या दोन दिवसांपासून महाराष्ट्राचे मिनी कश्मीर म्हणून ओळखल्या जाणारया महाबळेश्वरमध्ये पारा  वेगाने खाली उतरला आहे.  वेण्णालेक आणि लिंगमळा परिसरातील सुमारे 2 किलोमीटरच्या पट्ट्यात किमान  तापमान 3 अंश सेल्सियसपर्यंत खाली उतरलं. यामुळे त्याभागातील दवबिंदू गोठून हिमकण मोठ्या प्रमाणावर जमा झाले. या भागात गाडीच्या टपावर, शेतातील गवतावर,वेण्णालेक परिसरात सर्व ठिकाणी हिमकण गोठलेले पहायला मिळाले.