सोमवार, 27 जानेवारी 2025
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. महाराष्ट्र माझा
Written By

'ही' शिवसेनेची अधिकृत भूमिका नाही : संजय राऊत

येत्या 25 जानेवारी रोजी ठाकरे चित्रपटाशिवाय इतर कोणताही चित्रपट प्रदर्शित होऊ देणार नसल्याचा इशारा शिवसेना चित्रपट सेनेचे सरचिटणीस बाळा लोकरे यांनी दिला. मात्र चहूबाजूंनी यावर उलटसुलट प्रतिक्रिया उमटू लागल्यावर ते शिवसैनिकाचे वैयक्तिक मत असून तशी शिवसेनेची अधिकृत भूमिका नसल्याचे स्पष्टीकरण  खासदार संजय राऊत यांनी दिले.
 
बाळासाहेबांवर प्रेम करणारे आणि शिवसैनिकांचीदेखील हीच इच्छा असल्यामुळे आम्ही इतर कोणताही चित्रपट प्रदर्शित करू देणार नसल्याचा इशारा लोकरे यांनी दिला. 
 
ठाकरे चित्रपटासह 25 जानेवारी रोजी कंगणा राणावतची भूमिका असलेला आणि झाशीची राणी लक्ष्मीबाई यांच्या जीवनावर आधारित असलेला मणकर्णिका चित्रपट प्रदर्शित होणार आहे. त्याशिवाय इम्रान हाश्मीची मुख्य भूमिका असलेला चीट इंडिया चित्रपटदेखील प्रदर्शित होणार आहे.