मंगळवार, 23 एप्रिल 2024
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. महाराष्ट्र माझा
Written By
Last Modified: बुधवार, 21 जुलै 2021 (08:01 IST)

तुम्ही एकदा येऊन पाहा महाराष्ट्राचं सरकार काय करत आहे

सर्वोच्च न्यायालयाने सांगितलं आहे की महाराष्ट्र मॉडेल संपूर्ण देशात लावावं,तुम्ही लावाल का? हा सर्वोच्च न्यायालयाचा आदेश आहे की, मुंबई मॉडेलचा तुम्ही वापर करा.हा चेन्नई उच्च न्यायालयाचा आदेश आहे की मुंबई मॉडेला तुम्ही ऑक्सिनज वितरण आणि कोविड सेंटरबाबत म्हटलं आहे, तुम्ही वाचा एकदा सर्वोच्च न्यायालयाचा आदेश. तुम्ही काय मला सांगता महाराष्ट्र…तुम्ही एकदा येऊन पाहा महाराष्ट्राचं सरकार काय करत आहे.” असं म्हणत राज्यसभेत बोलताना संजय राऊत यांनी महाराष्ट्र सरकारवर टीका करणाऱ्यांवर व मोदी सरकार निशाणा साधला.
 
तसेच, ”लॉकडाउन सुरू आहे, लॉकडाउन सुरूच राहील. मात्र व्यापक लसीकरण.आपल्या देशात आतापर्यंत आपण किती लसीकरण केलेलं आहे. १२५ कोटी लोकसंख्येचा देश आहे, किती टक्के लसीकरण आपण केलेलं आहे? आजही संपूर्ण देशात लसीकरणाचा तुटवडा आहे. आज देखील लसीकरण केंद्रावर लोक लसीसाठी गोंधळ घालत आहेत आणि आपण सहा कोटी लसी परदेशात पाठवल्या.आपण ९ हजार मेट्रीक टन ऑक्सिजन परदेशात पाठवला.यामुळे आपल्या आरोग्य यंत्रणेची संपूर्ण पोलखोल झाली आहे. आता आपण तिसऱ्या लाटेबद्दल बोलत आहोत,तर तिसऱ्या लाटेला सामोरं जाण्यासाठी आपली काय तयारी आहे?आपण रुग्णालयांमध्ये किती बेड वाढवले आहेत? आपण किती डॉक्टर, नर्स तयार केले आहेत? ऑक्सिजनचे किती प्लॉन्ट उभारले आहेत,किती व्हेंटिलेटर्सची खरेदी केली आहे? रूग्णवाहिका किती आणल्या आहेत?आणि औषधांचे काय नियोजन केले आहे? हे तुम्हाला सांगावं लागेल.” असा प्रश्नांचा भडीमार संजय राऊत यांच्याकडून यावेळ मोदी सरकारवर करण्यात आला.