मंगळवार, 24 डिसेंबर 2024
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. महाराष्ट्र माझा
Written By
Last Modified: मंगळवार, 20 जुलै 2021 (22:37 IST)

मनसेने महापालिकेला घोषीत केले ‘कैलासवासी पुणे महानगरपालिका’

पुणे आणि पिंपरी चिंचवड महापालिकांच्या निवडणुका काही महिन्यांवर येऊन ठेपल्या आहेत. त्यामुळे, सत्ताधाऱ्यांबरोबरच मनसे देखील आक्रमक झाली असून निवडणुकीची जय्यत तयारी देखील सुरु केली आहे.  मनसेने पुण्यात महापालिकेचा “कैलासवासी पुणे महानगरपालिका” असा उल्लेख करत जोरदार होर्डिंगबाजी करत पालिकेच्या ढिसाळ कारभारावर निशाणा साधला आहे. मनसेने जसासतसे उत्तर दिल्याने सत्ताधारी भाजप आणि विरोधी पक्षांमध्ये विकासकामांवरून शीतयुद्ध रंगू लागले आहे.
 
२२ जुलै रोजी विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांचा वाढदिवस आहे. त्यामुळे कोरोनाचे गांभिर्य लक्षात घेवून कार्यकर्त्यांनी कोणत्याही प्रकराची जाहिरबाजी करू नये, असे आवाहन करण्यात आले होते. मात्र पदाधिकाऱ्यांनी वरिष्ठांचे सुचना डावलून पुण्यात देवेंद्र फडणवीस नव्या पुण्याचे शिल्पकार असा उल्लेख करत स्वत:ची चमकोगिरी केली आहे दुसरीकडे पुणे महानगरपालिकेच्या वतीने खराडीतील जुना मुंढवा रस्त्यावर प्रभाग क्रमांक ४ मध्ये उभारण्यात आलेल्या क्रीडांगण व मनोरंजन नगरीच्या झालेल्या दुरावस्थेबाबत खराडी तील मनसेच्या कार्यकर्त्यांनी पुणे महापालिकेच्या दुर्लक्षाने व गलथान कारभाराविरोधात चक्क महापालिकेला “कैलासवासी पुणे महानगरपालिका” असा उल्लेख करून श्रद्धांजली वाहिली.
 
दरम्यान, खराडीतील प्रभाग क्रमांक ४ मधील सर्वे नंबर ३० जुना मुंढवा रस्ता या ठिकाणी पुणे महापालिकेच्या वतीने व उभारली आहे. मात्र दुरवस्थेबाबत मनसेने फलक लावून प्रशासनाचे व नागरिकांचे लक्ष वेधले आहे उद्यानाच्या हातातील खेळणे तुटलेले असून कमर एवढे गवत व स्वच्छतागृहांच्या दूरदर्शनबाबत पालिकेने केलेल्या कोट्यवधी रूपये खर्च पाण्यात गेल्याबाबत फलक क्रीडांगणालाच लावला आहे.