शनिवार, 4 जानेवारी 2025
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. महाराष्ट्र माझा
Written By
Last Modified: गुरूवार, 16 मे 2019 (16:20 IST)

अनिसचे अनोखे आव्हान, अंधश्रद्धा निर्मूलनासाठी स्पर्धा

फलज्योतिष व वास्तुशास्त्राला शास्त्र माणणार्‍या कथित तज्ज्ञांना लोकसभा निकाल अचूक सांगा व २१ लाख रुपये जिंका, असे आव्हान अंधश्रद्धा निर्मूलन समितीने दिले आहे. समितीने याबाबत प्रश्नावली जाहीर केली असून त्यात सध्याच्या लोकसभा निवडणुकीत कोणत्या पक्षाचे कोणकोणते उमेदवार निवडून येतील, किती मताधिक्याने निवडून येतील, त्यांची टक्केवारी किती असेल, ‘नोटा’ किती लोक वापरतील आदी २५ प्रश्न विचारले आहेत. ही प्रश्नावली पूर्ण करून २० मेपर्यंत ती समितीकडे सादर करावी. यातील सर्व प्रश्नांची अचूक उत्तरे देणार्‍यास २१ लाख रुपयांचे बक्षीस दिले जाईल, असे समितीने स्पष्ट केले आहे.
 
यासोबतच नाशिकमध्ये शनिवार (दि.१८) व रविवारी (दि.१९) होणार्‍या राज्यस्तरीय वास्तु-ज्योतिष अधिवेशनाला महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन समितीने विरोध केला आहे.