सोमवार, 27 जानेवारी 2025
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. महाराष्ट्र माझा
Written By
Last Modified: गुरूवार, 28 जानेवारी 2021 (16:35 IST)

नवा विक्रम : तिरंगा घेऊन 72 किमीचे अंतर 9 तास 23 मिनिटात पूर्ण

कोल्हापूरच्या कमला कॉलेजची धावपटू आसमा अजमल कुरणे हिने प्रजासत्ताक दिनाचे औचित्य साधून ताराराणी विद्यापीठ ते जयसिंगपूर असे 72 किमतीचे अंतर 9 तास 28 मिनिटात पूर्ण करीत नवा विक्रम स्थापित केला आहे.
 
सकाळी सहा वाजता या उपक्रमाची सुरुवात झाली होती. आसमाने न थांबता सलग 72 किमीचे अंतर पार केले. तिने जीपीएस प्रणालीचा वापर करत वेळेची नोंद केली. तिच्या उपक्रमाची दखल नॅशनल बुक ऑफ रेकॉर्डमध्ये लवकरच होईल.