जाणून घ्या, स्वातंत्र्य दिन आणि प्रजासत्ताक दिनी ध्वजारोहणातील 7 फरक...

independence day
Last Modified मंगळवार, 11 ऑगस्ट 2020 (15:00 IST)
आपण कधी यावर लक्ष दिले आहेत का की प्रजासत्ताक दिन (26 जानेवारी) आणि स्वातंत्र्य दिन (15 ऑगस्ट) रोजी झेंडा फडकवण्यात काय फरक आहे ते? तर चला जाणून घ्या या दोन्ही दिवशी ध्वजारोहणातील फरक काय..

* 15 ऑगस्ट स्वातंत्र्य दिनाला झेंडा खालून रश्शीने खेचून वर नेण्यात येतो आणि मग उघडून फडकवला जातो ज्याला ध्वजारोहण असे म्हणतात कारण हे 15 ऑगस्ट 1947 च्या ऐतिहासिक घटनेला सन्मान देण्याच्या हेतूने केलं जातं, तेव्हा पंतप्रधानांनी असेच केले होते. इंग्रजीत याला Flag Hoisting असे म्हणतात.

जेव्हाकि 26 जानेवारी प्रजासत्ताक दिनी झेंडा वरच बांधलेला असतो आणि त्याला उघडून फडकवण्यात येतं ज्याला संविधानात Flag Unfurling (झेंडा फडकवणे) असे म्हटलं जातं.
* 15 ऑगस्ट रोजी पंतप्रधान ध्वजारोहण करतात कारण या दिवशी भारतीय संविधान लागू झाले नव्हते आणि राष्ट्राध्यक्ष जे राष्ट्राचे संवैधानिक प्रमुख असतात त्यांनी पदभार ग्रहण केला नव्हता. या दिवशी संध्याकाळी राष्ट्राध्यक्ष आपले संदेश राष्ट्राच्या नावावर देतात. जेव्हाकी 26 जानेवारी देशात संविधान लागू होण्याच्या निमित्ताने साजरी केली जाते त्या दिवशी संवैधानिक प्रमुख राष्ट्राध्यक्ष झेंडा फडकवतात.
* स्वातंत्र्य दिनाला लाल किल्ल्यावर ध्वजारोहण केलं जातं जेव्हाकी प्रजासत्ताक दिनी राजपथावर झेंडा फडकावला जातो.

* संपूर्ण भारतात प्रजासत्ताक दिन सांस्कृतिक कार्यक्रम आणि इतर आयोजनासह साजरा केला जातो जेव्हाकी स्वातंत्र्य दिन साध्या पद्धतीने साजरा केला जातो.

* प्रजासत्ताक दिवशी देश आपली सैन्य ताकद आणि सांस्कृतिक विलक्षणता दर्शवतो. जेव्हाकी स्वातंत्र्य दिन असे काही आयोजन नसतात.
* 26 जानेवारीला प्रजासत्ताक दिनी समारंभात प्रमुख अतिथींना आमंत्रण दिलं जातं.

* 26 जानेवारी आणि 15 ऑगस्ट दोन्ही राष्ट्रीय सण आहे. 26 जानेवारीला प्रजासत्ताक दिन तर 15 ऑगस्टला स्वातंत्र्य ‍दिन असे म्हटलं जातं.


यावर अधिक वाचा :

ज्ञानवापी सर्वेक्षणावर बंदी घालण्यास सर्वोच्च न्यायालयाचा ...

ज्ञानवापी सर्वेक्षणावर बंदी घालण्यास सर्वोच्च न्यायालयाचा नकार, शिवलिंगाची जागा सील करून नमाज अदा सुरू ठेवण्याचे आदेश
ज्ञानवापी मशिदीच्या सर्वेक्षणाला स्थगिती देण्यास सर्वोच्च न्यायालयाने नकार दिला या ...

विवाहितेवर दिवसाढवळ्या बलात्कार; दोघा भावांना अटक

विवाहितेवर दिवसाढवळ्या बलात्कार; दोघा भावांना अटक
मुंबई: अनोळखी क्रमांकावरून मिस कॉल आला. मिस कॉलवरून संवाद रंगला. पुढे फेसबुकवरून मैत्री ...

कर्नाटकातील शालेय पुस्तकातून भगतसिंग यांच्याशी संबंधित ...

कर्नाटकातील शालेय पुस्तकातून भगतसिंग यांच्याशी संबंधित मजकूर काढून टाकणे म्हणजे शहीदांचा अपमान : केजरीवाल
दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांनी मंगळवारी शालेय पुस्तकातून भगतसिंग यांच्यावरील ...

माडसांगवीत पतीने केला पत्नीचा निघृण खून

माडसांगवीत पतीने केला पत्नीचा निघृण खून
नाशिक nashik शहरालगत असलेल्या माडसांगवी गावात भीषण प्रकार घडला आहे. संतापलेल्या पतीने ...

शरद पवारांकडूनच राज्यातील महाविकास आघाडी सरकार अस्थिर ...

शरद पवारांकडूनच राज्यातील महाविकास आघाडी सरकार अस्थिर करण्याचा डाव? भाजपचा गंभीर आरोप
महाराष्ट्रात सध्या शरद पवार यांच्या मूक संमतीने सरकार पुरस्कृत दहशतवाद माजला असून ...

मनसे अध्यक्ष राज ठाकरेंच्या सभेचा दुसरा टीजर जाहीर

मनसे अध्यक्ष राज ठाकरेंच्या सभेचा दुसरा टीजर जाहीर
मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांची उद्या रविवारी पुण्याच्या स्वारगेट परिसरातील गणेश कला क्रीडा ...

Nawab Malik Case:नवाब मलिक यांच्याविरुद्ध ईडीच्या ...

Nawab Malik Case:नवाब मलिक यांच्याविरुद्ध ईडीच्या आरोपपत्रावर न्यायालयाने म्हटले- डी कंपनीशी संबंध असल्याचा पुरावा
डी-कंपनीशी मिलीभगत आणि मनी लाँड्रिंगच्या आरोपाचा सामना करत असलेले राष्ट्रवादीचे नेते नवाब ...

लाल महालात लावणी करणे महागात पडले, वैशाली पाटील सह तिघांवर ...

लाल महालात लावणी करणे महागात पडले, वैशाली पाटील सह तिघांवर गुन्हा दाखल
पुण्याच्या लालमहालच्या परिसरात 16 एप्रिल 2022 रोजी लावणी करून त्याचा व्हिडीओ व्हायरल करणे ...

DC vs MI अर्जुन तेंडुलकर आयपीएल 2022 च्या सर्वात रोमांचक ...

DC vs MI अर्जुन तेंडुलकर आयपीएल 2022 च्या सर्वात रोमांचक सामन्यात पदार्पण करेल! दिल्ली विरुद्ध मुंबई सामन्यातील संभाव्य प्लेइंग इलेव्हन
इंडियन प्रीमियर लीग (IPL) च्या 15 व्या हंगामातील सर्वात रोमांचक सामना शनिवारी मुंबईच्या ...

मंकीपॉक्सचे रुग्ण वाढू शकतात, जागतिक आरोग्य संघटनेचा इशारा

मंकीपॉक्सचे रुग्ण वाढू शकतात, जागतिक आरोग्य संघटनेचा इशारा
कोविडनंतर आता जगाला मंकीपॉक्स व्हायरसचा धोका आहे. वर्ल्ड हेल्थ ऑर्गनायझेशन (WHO) ने इशारा ...