शुक्रवार, 26 एप्रिल 2024
  1. मराठी बातम्या
  2. आज-काल
  3. प्रजासत्ताक दिन
Written By
Last Modified: सोमवार, 25 जानेवारी 2021 (11:00 IST)

प्रजासत्ताक दिन विशेष: भारतीय ध्वज संहिता काय म्हणते, काय करावं आणि काय करू नये जाणून घेऊ या

भारताच्या राष्ट्रीय ध्वजावर तीन रंग आहेत. म्हणून ह्याला तिरंगा म्हणतात. राष्ट्रध्वजाच्या वरच्या पट्टीवर भगवा किंवा केशरी रंग असतो जो देशाची शक्ती आणि धैर्य दर्शवितो. मध्यभागी असलेली पांढरी पट्टी धर्म चक्रासह शांती आणि सत्याचे प्रतीक आहे. खालची हिरवी पट्टी सुपीकता, वाढ आणि भूमीची पावित्र्यता दर्शविते.
 
चक्र- या धर्म चक्राला विधीचे चक्र म्हटले आहे जे तिसऱ्या शतकात इ.स.पू.मौर्य सम्राट अशोक ने बनविलेल्या सारनाथ मंदिरातून घेतले आहे. या चक्राला दर्शविण्याचा अर्थ आहे की जीवन गतिशील आहे आणि जीवन थांबणे म्हणजे मृत्यू होणं असं आहे.
 
ध्वज संहिता- 26 जानेवारी 2002 रोजी भारतीय ध्वज संहितेमध्ये सुधारणा करण्यात आली आणि स्वातंत्र्यताच्या बऱ्याच वर्षानंतर भारताच्या नागरिकांना आपल्या घरात,कार्यालयात आणि कारखान्यात केवळ राष्ट्रीय दिवसातच नव्हे तर इतर कोणत्याही दिवशी कोणत्याही व्यत्ययाशिवाय फडकविण्याची परवानगी देण्यात आली. आता भारताचे नागरिक राष्ट्रीय ध्वजाला अभिमानाने कुठे ही आणि कधीही फडकवू शकतात.परंतु  त्यांना ध्वजाच्या संहितेचे काटेकोर पालन करावे लागतील. जेणे करून तिरंग्याचा मान कमी होऊ नये. 
 
सुविधेच्या दृष्टीने भारतीय ध्वज संहिता 2002 ला तीन भागात विभागले आहेत. संहिताच्या पहिल्या भागात राष्ट्रीय ध्वजाचे सामान्य वर्णन केले आहे. संहिताच्या दुसऱ्या भागात सार्वजनिक, खाजगी संस्था, शैक्षणिक संस्था इत्यादी सदस्यांद्वारे राष्ट्रीय ध्वजाच्या कार्य प्रदर्शनाच्या विषयी  सांगितले आहे. संहिताचा तिसरा भाग केंद्र आणि राज्यसरकार आणि त्यांच्या संघटना आणि एजन्सीद्वारे राष्ट्रीय ध्वजाच्या प्रदर्शनाच्या विषयी माहिती देतो. 
 
26 जानेवारी 2002 च्या कायद्यावर आधारित काही नियम आणि कायदे सांगितले आहे की ध्वज कसे फडकवायचे आहे. 
 
काय करावे-
 
* राष्ट्रीय ध्वज शैक्षणिक संस्थां मध्ये(शाळा,महाविद्यालये,खेळ परिसर, स्काउट कॅम्पस इत्यादी मध्ये) ध्वजाला सन्मान देण्याची प्रेरणा देण्यासाठी  फडकवले जाऊ शकते. शाळांमध्ये ध्वजारोहणात निष्ठेची शपथ समाविष्ट केली आहे.
 
* कोणत्याही सार्वजनिक,खासगी संस्था किंवा शैक्षणिक संस्थेच्या सदस्यांद्वारे राष्ट्रध्वजाचे अरोहण/प्रदर्शन सर्व दिवस आणि प्रसंगी, कार्यक्रम राष्ट्रध्वजाचा सन्मान आणि प्रतिष्ठेनुसार करू शकतात. 
 
* नवीन संहितेच्या कलम 2 सर्व खासगी नागरिकांना त्यांच्या परिसरात ध्वज फडकविण्याचा अधिकार देण्यात येत आहे. 
 
काय करू नये- 
 
* या ध्वजाला जातीय फायदे, पडदे, किंवा वस्त्र म्हणून वापरले जाऊ शकत नाही. शक्य तितक्या हवामानाचा प्रभाव न पडू देता ध्वजाला सूर्योदयापासून सूर्यास्त पर्यंत फडकवावे.
 
* या ध्वजाला जाणीवपूर्वक, जमिनीवर,फरशीवर,किंवा पाण्यात स्पर्श करू नये. ह्याला वाहनाच्या वर,मागील बाजूस आणि बाजूला,तसेच ह्याला  रेल, नाव  किंवा होडी आणि विमान गुंडाळले जाऊ शकत नाही.
 
* कोणते ही इतर ध्वज किंवा ध्वजस्तंभ आपल्या ध्वजापेक्षा उंच लावता येणार नाही. तिरंगी ध्वजाला तोरण,ध्वज पट्टी किंवा गुलाबाच्याफुला समान रचना  करून वापरता येणार नाही.