1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. महाराष्ट्र माझा
Written By
Last Modified: मंगळवार, 3 जून 2025 (11:33 IST)

अकोल्यात काँग्रेस नेत्याच्या भावाची हत्या; डोक्यावर लोखंडी रॉडने केले अनेक वार

murder
काँग्रेस नेते विजय कौशल यांचे भाऊ संजय कौशल यांच्यावर जुन्या वादातून लोखंडी रॉडने हल्ला करण्यात आला. त्यांचा जागीच मृत्यू झाला.
मिळालेल्या माहितीनुसार महाराष्ट्रातील अकोला जिल्ह्यातील ज्येष्ठ काँग्रेस नेते विजय कौशल यांचे भाऊ आणि माजी अभियंता संजय कौशल यांची सोमवारी रात्री हत्या करण्यात आली. आरोपीचे नाव महेंद्र पवार आहे. आरोपीचे संजय कौशल यांच्याशी जुने वैर होते. त्यामुळे त्याने ही घटना घडवून आणली आहे.अशी माहिती समोर आली आहे.
संजय कौशल सार्वजनिक बांधकाम विभागातील अभियंता पदावरून निवृत्त झाले होते. महेंद्र पवार हा एका प्रकरणात तुरुंगात असलेला दोषी गुन्हेगार आहे. तो सध्या जामिनावर होता. त्याने संजय कौशल यांच्या छातीवर आणि डोक्यावर लोखंडी रॉडने अनेक वार केले, ज्यामुळे त्यांचा जागीच मृत्यू झाला. ही संपूर्ण घटना सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झाली आहे. पोलिस या प्रकरणाचा तपास करत आहे. 
Edited By- Dhanashri Naik