1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. महाराष्ट्र माझा
Written By
Last Modified: गुरूवार, 21 मार्च 2024 (08:32 IST)

काँग्रेसची महाराष्ट्रातील संभाव्य उमेदवारांची यादी समोर

congress
काँग्रेसच्या निवडणूक समितीची नवी दिल्ली येथे एक महत्त्वपूर्ण बैठक पार पडली असून या बैठकीत महाराष्ट्रातील काही उमेदवार निश्चित करण्यात आल्याची माहिती आहे. राज्यात काँग्रेस महाविकास आघाडीच्या माध्यमातून या निवडणुकीला सामोरे जाणार आहे. त्यामुळे आघाडीच्या जागावाटपात ज्या जागा काँग्रेसला मिळण्याची शक्यता आहे, त्या जागांवरील उमेदवारांबाबत आजच्या बैठकीत चर्चा झाल्याचे समजते.
 
नवी दिल्ली येथे काँग्रेस मुख्यालयात झालेल्या बैठकीला काँग्रेस संसदीय पक्षाच्या अध्यक्षा सोनिया गांधी, काँग्रेस अध्यक्ष मल्लिकार्जुन खर्गे, अखिल भारतीय काँग्रेस कमिटीचे संघटन महासचिव के. सी. वेणूगोपाल, प्रभारी रमेश चेन्नीथला, माजी केंद्रीय मंत्री अंबिका सोनी, सलमान खुर्शीद, मधुसूदन मिस्त्री पी.एल. पुनिया यांच्या प्रमुख उपस्थितीत पार पडली. या बैठकीला महाराष्ट्र काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले, विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार आणि बाळासाहेब थोरात उपस्थित होते. बैठकीत काही नावांबाबत एकमत झाल्याची माहिती आहे.
 
काँग्रेसच्या संभाव्य उमेदवारांची यादी
नागपूर       - विकास ठाकरे
नांदेड         - वसंत चव्हाण
लातूर         - शिवाजी काळगे
नंदुरबार     - के.सी.पाडवी
गडचिरोली - नामदेव उसेंडी
कोल्हापूर  - शाहू महाराज छत्रपती
सोलापूर    - प्रणिती शिंदे
पुणे           - रविंद्र धंगेकर
अमरावती  - बळवंत वानखेडे
 
दरम्यान, या उमेदवारांबाबत काँग्रेसकडून अद्याप अधिकृतरित्या माहिती देण्यात आलेली नसली तरी कोणत्याही क्षणी आम्ही उमेदवारांची घोषणा करू,  असं के. सी. वेणूगोपाल यांनी सांगितलं आहे.
Edited by Ratnadeep Ranshoor