नांदेड मध्ये काँग्रेसच्या आमदाराच्या गाडीवर हल्ला तोडफोड
भाजपचे नेते निलेश राणे यांच्या गाडीवर हल्ला करून तोडफोड करण्यात आली असताना आता काँग्रेसचे आमदार मोहन हंबर्डे यांच्या गाडीवर कीर्तनाला जात असताना काही हल्लेखोरांनी दगडफेक करून तोडफोड करण्यात आली.
सदर घटना नांदेडच्या पिंपळ गावात घडली.आमदार मोहन हंबर्डे हे पिंपळ गावात नीमजी येथे एका कीर्तनाच्या कार्यक्रमात आले असता काही अज्ञातांनी त्यांच्या गाडीची तोडफोड केली. या हल्ल्यात सुदैवाने आमदार हंबर्डे सुरक्षित आहे.
सध्या मराठा आरक्षणाला घेऊन सर्वत्र आक्रमक स्थिती आहे. मनोज जरांगे हे पुन्हा आंतरवली सराटी येथे आरक्षण आंदोलनाला बसले आहे. जो पर्यंत सगे सोयरे यांना आरक्षण देण्याचा कायदा बनत नाही तो पर्यंत ते उपोषणावर बसणार आहे असे मनोज जरांगे पाटील यांनी सांगितले आहे.
येत्या 20 फेब्रुवारी रोजी राज्य सरकारने या वर तोडगा काढण्यासाठी विशेष अधिवेशन बोलावले आहे.
Edited by - Priya Dixit