संबंधित माहिती
- ‘अटकी, भटकी आणि लटकी काँग्रेस’, मोदींच्या संसदेतील भाषणाचे 3 अर्थ
- लालकृष्ण आडवाणींना भारतरत्न देण्यामागचे राजकीय अर्थ काय आहेत?
- लालकृष्ण आडवाणी यांना भारतरत्न, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केले ट्वीट
- ज्येष्ठ नेते आणि माजी उपपंतप्रधान लालकृष्ण अडवाणींना भारतरत्न जाहीर
- पंतप्रधान नरेंद्र मोदी 19 फेब्रुवारी रोजी पुन्हा एकदा महाराष्ट्राचा दौरा करणार
कोस्टल रोडच्या पहिल्या टप्प्याचे लोकार्पण लांबले
मुंबईतील पहिल्या कोस्टल रोडच्या पहिल्या टप्प्याचे लोकार्पण पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते 19 फेब्रुवारी रोजी करण्यात येणार होते. तर संपूर्ण काम मे महिन्यात पूर्ण होणार असून त्यानंतर त्याचे पूर्णपणे लोकार्पण करण्याचे नियोजन होते; मात्र काही कारणास्तव लोकार्पण करण्याचा मुहूर्त पुढे ढकलण्यात आला आहे.
मुंबईत वाढती लोकसंख्या व वाढती वाहन संख्या पाहता मुंबईतील वाहतूक कोंडीची समस्या मार्गी लावण्यासाठी मुंबई महापालिकेने प्रिन्सेस स्ट्रीट ते वरळी सी लिंकपर्यंतच्या 10.58 किमी लांबीच्या कोस्टल रोडचे काम हाती घेतले. त्यासाठी हिंदुस्तान कन्स्ट्रक्शन व लार्सन अँड टुब्रो या कंपन्यांना दोन टप्प्यात कामे विभागून देण्यात आली. या कोस्टल रोड च्या कंत्राट कामाची मूळ किंमत 12 हजार 721 कोटी रुपये होती. मात्र कामात काही बदल झाल्याने काम वाढले, खर्च वाढला आणि कामाची मुदतही वाढली. त्यामुळे प्रकल्प खर्च थेट 14 हजार कोटी रुपयांपर्यंत पोहोचला आहे. मात्र या कोस्टल रोडच्या कामामुळे मुंबईकरांचा प्रवास सुखकर व जलद होणार आहे.
Edited By - Ratnadeep ranshoor
