मराठा आरक्षण: काँग्रेस आमदार सामूहिक राजीनामे देण्याच्या तयारीत
मुंबई- मराठा आरक्षणावर राज्य सरकरावर दबाव वाढत जात असून एक आता काँग्रेस आमदार सामूहिक राजीनामे देण्याच्या तयारीत दिसत आहे.
विधान भवनात झालेल्या बैठकीत काँग्रेस आमदारांनी तीव्र भावना व्यक्त करत सरकार ठोस निर्णय घेण्यात अपयशी ठरत असल्याची टीका केली गेली. काँग्रेस प्रदेशाध्यक्ष अशोक चव्हाण यांच्या उपस्थितीत झालेल्या या बैठकीत काँग्रेस आमदारांनी मराठा समाजाच्या बाजूने उभे राहून राजीनामा देण्याची तयारी ठेवल्याचे सांगण्यात येते.
जनतेच्या संयमाची परीक्षा न पाहता सरकारने याबद्दल तातडीने निर्णय घ्यावी अशी मागणी चव्हाण यांनी केली आहे.