काँग्रेस-राष्ट्रवादीने ४८ तासांत पुरावेही सादर करावे : मुनगंटीवार
भारतीय जनता पार्टीवर आमच्या आमदारांना खरेदी करण्याचा प्रयत्न होत असल्याचा आरोप करण्याऱ्या काँग्रेस-राष्ट्रवादीने जनतेची माफी मागावी अशी मागणी भाजपा नेते सुधीर मुनगंटीवार यांनी केली आहे. तसेच असा आरोप करणाऱ्या काँग्रेस-राष्ट्रवादीने ४८ तासांत याचे पुरावेही सादर करावेत असेही त्यांनी म्हटले आहे.
भाजपा कुठल्याही आमदाराच्या संपर्कात नाही. आमच्यावर होत असलेला आमदार खरेदी-विक्रीचा आरोप खोटा आहे. त्यामुळे काँग्रेस-राष्ट्रवादी काँग्रेसने येत्या ४८ तासांत पुरावे द्यावेत. आम्ही कोणालाही फोन केलेला नाही. मात्र तुमचा आरोप असेल तर आपल्या फोनमधील या संभाषणाचे रेकॉर्ड काढावे आणि सादर करावे, अशी मागणीही मुनगंटीवार यांनी केली आहे.
शिवसेनेने आपले आमदार फुटतील या भीतीने नव्हे तर दुसऱ्याच कुठल्यातरी कारणासाठी त्यांना हॉटेलवर नेऊन ठेवले आहे. भाजपा कुठल्याही आमदाराच्या संपर्कात नाही असे सांगितले.