गुरूवार, 9 जानेवारी 2025
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. महाराष्ट्र माझा
Written By
Last Modified: शुक्रवार, 8 नोव्हेंबर 2019 (10:25 IST)

ट्विटरवर राज्यातले राजकरण ट्रेंडिंगमध्ये

महाराष्ट्रात सत्ता कुणाची स्थापन होणार? याची चर्चा थेट देशभरात सुरू असल्याचं पाहायला मिळत आहे. अवघ्या देशाचं लक्ष महाराष्ट्रातलया राजकीय घडामोडींकडे लागलं आहे.

त्यामुळेच मुंबईत एकीकडे भाजप, शिवसेना यांच्या सत्तास्थापनेसंदर्भात घडामोडी सुरू असताना ट्विटरवर देशभरातील जनता #MaharashtraPoliticalCrisis या हॅशटॅगवर ट्विट करताना दिसत आहेत. ट्विटरवर हा हॅशटॅग ट्रेंडिंगमध्ये असून नेटिझन्स महाराष्ट्रातल्या घडामोडींवर आपापल्या प्रतिक्रिया व्यक्त करत आहेत. काहींनी तर त्यासाठी मीम्सचा देखील आधार घेतला आहे. अनेक नेटिझन्सनी शिवसेना आणि भाजपच्या राजकीय गोंधळावर टीका करत मतदारांची बाजू मांडली आहे.