सोमवार, 23 डिसेंबर 2024
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. महाराष्ट्र माझा
Written By

भिडे यांची भेट नाकारली असा दावा, तर मातोश्री वरून संभाजी भिडे माघारी

संभाजी भिडे हे अचानक आज मुंबई येथे 
शिवप्रतिष्ठान हिंदुस्तानचे प्रमुख संभाजी भिडे हे मातोश्रीवर गेले होते. भिडे हे शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांची भेट घेण्यासाठी मातोश्रीवर गेले होते. मात्र उद्धव ठाकरेंची भेट न घेता ते मातोश्रीवरुन निघून गेले. तर दुसरीकडे संभाजी भिडे अचानक मातोश्रीवर आल्याने राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण आले आहे.
 
मिळालेल्या माहितीनुसार, संभाजी भिडे हे मातोश्रीवर उद्धव ठाकरे यांची भेट घेण्यासाठी गेले होते. मात्र उद्धव ठाकरे मातोश्रीवर नसल्याने संभाजी भिडे यांची भेट झाली नसून, संभाजी भिडे जवळपास 20 मिनिटे मातोश्रीवर थांबले होते. उद्धव ठाकरे मातोश्रीवर न परतल्याने त्या दोघांची भेट होऊ  शकली नाही. तर दुसरीकडे राष्ट्रवादीचे नेते जितेंद्र आव्हाड यांनी यावर जोरदार टीका केली आहे. भिडे यांना भेट नाकारल्याचा दावा राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते जितेंद्र आव्हाड यांनी केला आहे. जितेंद्र आव्हाड यांनी केलेल्या ट्विटनुसार, “संभाजी भिडे हे मातोश्रीवर संघ आणि भाजपकडून सत्तास्थापनेसंदर्भात प्रस्ताव घेऊन आले होते. मात्र उद्धव ठाकरेंनी त्यांची भेट नाकारली असेही आव्हाड यांच्या ट्विटमध्ये नमूद करण्यात आले आहे.