1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. महाराष्ट्र माझा
Written By
Last Modified: गुरूवार, 7 नोव्हेंबर 2019 (09:36 IST)

नववर्षात भाजपाला मिळणार नूतन प्रदेशाध्यक्ष खडसे, तावडे, पंकजा मुंडेच्या नावाची चर्चा

Discussion on the name of the new state president Khadse
विधानसभा निवडणुकीत झालेल्या भाजपाच्या अपेक्षाभंगाच्या पार्श्वभूमीवर प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांना पायउतार व्हावे लागणार आहे. नवीन प्रदेशाध्यक्षाची घोषणा ३१ डिसेंबरला करण्यात येणार असल्याची माहिती भाजपचे नेते आणि अर्थमंत्री सुधीर मुनगंटीवर यांनी दिली आहे. विधानसभा निवडणुकीत सत्ताधारी भाजपाला मिळालेल्या अपक्षेपेक्षा कमी जागा तसेच ‘होम टाऊन’ असलेला कोल्हापूर ‘भाजपा मुक्त’ झाल्याने त्यांच्याविषयीची नाराजी या बदलामागे असल्याचे बोलले जात आहे.
 
नुकत्याच झालेल्या भाजपा कोअर कमिटीत हा निर्णय झाला असून नूतन प्रदेशाध्यक्षपदी एकनाथ खडसे, विनोद तावडे, पंकजा मुंडे यांच्यासह निष्ठावंतांचीच नावे चर्चेत आहे. प्रदेशाध्यक्ष बदलाबाबत अधिक माहिती देताना मुनगंटीवार म्हणाले की, राष्ट्रीय पातळीवर याबाबत निर्णय झाला असून यावेळी पक्षाध्यक्ष बदलला जातो. तसेच, ९१ हजार बूथ अध्यक्षांची तसेच भाजप जिल्हाध्यक्षांचीही निवड प्रक्रिया पूर्ण केली जाईल.