आम्ही सक्षम विरोधी पक्ष म्हणून काम पाहणार - खा. शरद पवार

sharad panwar
Last Modified गुरूवार, 7 नोव्हेंबर 2019 (09:40 IST)
भाजपा शिवसेना या दोघांना महाराष्ट्राच्या जनतेने सत्तास्थापनेसाठी कौल दिला आहे. त्यांनी लवकरात लवकर सरकार बनवावे. जनतेने आघाडीला विरोधी बाकावर बसण्याची सुसंधी दिली आहे, त्यामुळे ते काम समर्थपणे पार पाडण्याची आमची भूमिका आहे, असे स्पष्ट मत राष्ट्रवादी काँग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष खा. शरद पवार यांनी मुंबईतील यशवंतराव चव्हाण प्रतिष्ठान येथे आयोजित पत्रकार परिषदेत व्यक्त केले.
यावेळी देश आणि राज्यातील विविध घडामोडींवर पवार यांनी भाष्य केले. अवकाळी पावसामुळे शेतकऱ्यांचे प्रचंड नुकसान झाले आहे. केंद्रातून शेतकऱ्यांना मदत मिळावी यासाठी आम्ही प्रयत्न करत आहोत. अनेक शेतकऱ्यांनी वीमा काढला आहे पण विमा कंपन्या त्यांची जबाबदारी पार पाडत नाहीत. त्यामुळे सरकारने बैठक घेऊन आवश्यक त्या सूचना कंपन्यांना द्याव्यात, अशी मागणी पवार यांनी यावेळी केली.
काल दिल्लीमध्ये पोलिसांना वाईट वागणूक मिळाली. युनिफॉर्म मध्ये असतानाही पोलिसाला मारहाण झाली, पोलिसांवरील हल्ल्यांची संख्या ज्यापद्धतीने वाढत आहे, त्यामुळे देशातील पोलिसांचे खच्चीकरण होत आहे. संपूर्ण देशात पोलिसांची परिस्थिती हलाखीची आहे. कायदा आणि सुव्यवस्था सांभाळणाऱ्या व्यक्तींचे अशारितीने मनोबल खच्ची झाले तर ही अत्यंत गंभीर बाब आहे, अशी टिप्पणी पवार यांनी केली. दिल्ली पोलिसांचे मनोबल उंचावण्यासाठी दिल्लीच्या जनतेने भूमिका घेतली हे स्वागतार्ह आहे. दिल्लीत जो प्रकार घडला त्याची गंभीर नोंद घेण्याची जबाबदारी केंद्र सरकारची आहे. केंद्र सरकारने यात तातडीने लक्ष घालण्याची गरज असल्याचे मत पवार यांनी यावेळी व्यक्त केले.
लवकरच सर्वोच्च न्यायालयाकडून अयोध्या निकाल अपेक्षित आहे. निकाल लागल्यानंतर समाजातील कोणत्याही घटकाने हा निकाल आपल्याविरोधात लागला आहे, असा विचार करू नये. न्यायालयीन निर्णय लागल्यावर तो सामंजस्याने स्वीकारावा, निकाल काहीही लागला तरी कोणीही कायदा हातात घेऊ नये, जी परिस्थिती १९९२ साली उद्भवली त्याची पुनरावृत्ती होऊ नये, असे आवाहन पवार यांनी केले. यावेळी प्रदेशाध्यक्ष आ. जयंत पाटील, मुख्य प्रवक्ते आ. नवाब मलिक, राष्ट्रीय सरचिटणीस आ.जितेंद्र आव्हाड
आणि अन्य पदाधिकारी उपस्थित होते.


यावर अधिक वाचा :

व्हायरसच्या संक्रमणापासून बचावासाठी या प्रकारे करा आपले ...

व्हायरसच्या संक्रमणापासून बचावासाठी या प्रकारे करा आपले वाहन सेनेटाइज...
फोन, लॅपटॉप सारख्या जास्त वापरण्यात येणाऱ्या वस्तूंचीही स्वच्छता करणे गरजेचं आहे. सध्या ...

श्रीसर्वोत्तम त्रैमासिक अंकाची ऑनलाईन प्रत जाहीर

श्रीसर्वोत्तम त्रैमासिक अंकाची ऑनलाईन प्रत जाहीर
मध्यप्रदेशातील एकमेव मराठी पत्रिका श्रीसर्वोत्तमने, वैश्विक संकट कोरोना मुळे आपल्या ...

आहारात दुधाचा समावेश करताना या 7 गोष्टी लक्षात ठेवणे आवश्यक

आहारात दुधाचा समावेश करताना या 7 गोष्टी लक्षात ठेवणे आवश्यक
बहुतांश लोक आरोग्य चांगले राहण्यासाठी दुधाचे सेवन करतात. पण ह्याच बरोबर ते अशा काही चुका ...

मुलींची पसंत : लाकडी दागिने

मुलींची पसंत : लाकडी दागिने
घरातील फर्निचरसाठीहोणारा लाकडाचा वापर नवीन नाही. परंतु, लाकडाचा वापर आता चक्क ...

केस रंगवताना घेण्यात येणारी काळजी

केस रंगवताना घेण्यात येणारी काळजी
सर्वात पहिली काळजी म्हणजे दर्जेदार रंगच निवडा, तिकडे तडजोड नको. पहिल्यांदाच रंग लावत असाल ...

जागतिक पर्यावरण दिन: हे संकल्प करूया ज्याने आपल्या पुढल्या ...

जागतिक पर्यावरण दिन: हे संकल्प करूया ज्याने आपल्या पुढल्या पिढ्यांना शुद्ध हवेत श्वास घेता येईल
दर वर्षी 5 जून रोजी विश्व पर्यावरण दिन साजरा केला जातो. या दिनाच्या निमित्ताने ...

वाचा, मराठी उद्योजकांना प्रोत्साहन देण्यासाठी राज ठाकरे काय ...

वाचा, मराठी उद्योजकांना प्रोत्साहन देण्यासाठी राज ठाकरे काय करतात ?
मराठी उद्योजकांना प्रोत्साहन देण्यात यावे यासाठी कटाक्षाने लक्ष देणारे नेता म्हणून राज ...

डॉक्टरलाच मिळाला नाही बेड, उशिरा मिळालेल्या उपचारांमुळे ...

डॉक्टरलाच मिळाला नाही बेड, उशिरा मिळालेल्या उपचारांमुळे  मृत्यू
मुंबईत हॉस्पिटलमध्ये बेड न मिळाल्यामुळे एका डॉक्टरलाच आपला जीव गमवला आहे. डॉ. चित्तरंजन ...

भारताच्या पतमानांकनात म्हणजेच रेटिंगमध्ये घट

भारताच्या पतमानांकनात म्हणजेच रेटिंगमध्ये घट
जागतिक रेटिंग एजन्सी मूडीजनं तब्बल 22 वर्षांनंतर भारताच्या पतमानांकनात म्हणजेच ...

तरुणाला झाडाला बांधून जिवंत जाळले, पोलीसांवरही हल्ला

तरुणाला झाडाला बांधून जिवंत जाळले, पोलीसांवरही हल्ला
प्रेम प्रकरणातील वादातून एका तरुणाला झाडाला बांधून जिवंत जाळल्याचा धक्कादायक प्रकार उत्तर ...