सोमवार, 27 जानेवारी 2025
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. महाराष्ट्र माझा
Written By
Last Modified: शुक्रवार, 8 नोव्हेंबर 2019 (09:42 IST)

पुणे येथे एक्स रे मशीनचा स्फोट झाला तेव्हा त्यात होती एक वर्षाची मुलगी, वाचा पुढे काय झाले

पुणे येथे मोठा धक्का दायक प्रकार घडला आहे. एका चिमुकलीच्या जीवावर उपचार आले आहेत. पिंपरी-चिंचवडमध्ये एक्स-रे मशीनचा स्फोट होऊन एक वर्षीय चिमुकली जखमी झाली असू, शार्वी भूषण देशमुख असे तिचे नाव आहे. घटनेत चिमुकलीची आई आणि आजोबा देखील किरकोळ जखमी झाले असून, या प्रकरणी  हलगर्जीपणा करणाऱ्या डॉक्टर आणि एक्स-रे सेंटर विरोधात पोलिसांत तक्रार दिली आहे. 
 
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, न्यूक्लेस डायग्नोस्टिक सेंटरमध्ये शार्वीची MCU टेस्ट करण्यासाठी आई, आजोबा तीला घेऊन गेले होते. सर्वात आगोदर शार्वीला इंजेशन दिले गेले, त्यानंतर टेस्ट सुरू झाली. मात्र, अचानक एक्स-रे मशीनचा काचेचा भाग फुटून मोठा आवाज झाला  होता, त्या मशीनमधून धूर, रसायन बाहेर निघाले. फुटून आवाज झाल्याने मशीनमधील रसायन शार्वीच्या अंगावर उडाले त्यामुळे ती  जखमी झाली आहे. सोबतच आई ,आजोबांच्या देखील अंगावर हे रसायन उडाल्याने यात ते किरकोळ जखमी झाले, शार्वीची प्रकृती ठीक असल्याची माहिती पोलीस उपनिरीक्षक निकम यांनी दिली. डॉक्टर आणि सेंटरच्या हलगर्जीपणा विरोधात शार्वीच्या आई-वडिलांनी पिंपरी पोलीस ठाण्यात तक्रार दिली आहे.