1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. महाराष्ट्र माझा
Written By
Last Updated : बुधवार, 28 सप्टेंबर 2022 (12:44 IST)

इगतपुरीतील काँग्रेचे प्रशिक्षण शिबीर अडचणीत ५० पेक्षा अधिक पदाधिकाऱ्यांची उपस्थिती

नाशिक जिल्ह्यात काँग्रेसच्या वतीने प्रशिक्षण शिबीर राबविण्यात येत आहे. मात्र हे करत असताना कोरोनाच्या नियमांचे उल्लंघन झाल्याचे समोर आले असून या कार्यक्रमाला परवानगी घेतली नसल्याचे सांगण्यात येत आहे.
दरम्यान मुंबई काँग्रेसचे दोन दिवशीय प्रशिक्षण शिबीर इगतपुरी येथे आयोजित केले आहे. आज शिबिराचे उद्घाटन सार्वजनिक बांधकाम मंत्री अशोक चव्हाण यांच्या हस्ते झाले. मात्र या ठिकाणी कार्यकर्त्यासंह पदाधिकाऱ्यांनी गर्दी केल्याचे आढळून आले. त्याचबरोबर सध्या निर्बंध असताना कार्यक्रम कोणाच्या परवानगीने होतो आहे, असे प्रश्न उपस्थित केले जात आहेत.
तर दुसरीकडे स्थानिक तहसीलदार यांनी कार्यक्रमाला परवानगी दिली नसल्याचा दावाकेला आहे. तसेच स्थानिक पोलिसांनी देखील काँग्रेसच्या कार्यक्रमाला नोटीस दिली आहे. त्यामुळे इगतपुरीतील काँग्रेचे प्रशिक्षण शिबीर अडचणीत आले आहे. या कार्यक्रमाला ५० पेक्षा अधिक पदाधिकाऱ्यांची उपस्थिती असल्याचे दिसून आले तर अनेक कार्यकर्त्यांच्या चेहऱ्यावर मास्क देखील नसल्याची परिस्थिती यावेळी होती. त्यामुळे कार्यक्रमात कोरोना नियमांचे उल्लंघन पाहायला मिळाले.
इगतपुरी तालुक्यातील बलायदुरी येथील रेनफॉरेस्ट रिसॉर्टमध्ये मुंबई काँग्रेसचे दोन दिवसाचे प्रशिक्षण शिबिर आयोजित करण्यात आले आहे. शिबिराचे उद्घाटन सार्वजनिक बांधकाम मंत्री अशोक चव्हाण यांच्या हस्ते झाले आहे. दोन दिवस चालणाऱ्या शिबिरात काँग्रेसचे दिग्गज नेते हजेरी लावणार असल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे.